बुधवार, २० जानेवारी, २०२१

सरपंच आरक्षण 27 जानेवारीला

 


कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2020 करिता 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने आरक्षणाची आकडेवारी, आरक्षण काढण्यासाठी ठिकाण व इतर सूचना कायम ठेवून तालुकानिहाय संबंधित तालुक्याच्या तहसिलदारांना जिल्हाधिकारी यांच्यावतीने प्राधिकृत करण्यात येवून आरक्षण सोडत काढण्याकामी बुधवार दि. 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. निश्चित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.

 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.