कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): संत
शिरोमणी सावता माळी रयत बाजार या अभियानांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट माल विक्री
करण्याकरिता शेतकरी/ शेतकरी गटांना
महाराष्ट्र शासन कृषी विभाग कार्यालय, कोल्हापूर येथे विभागीय कृषी
सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा
(आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आठवडी बाजार रविवार दि. 17 जानेवारी रोजी सकाळी
9 ते दु. 1 या कालावधीमध्ये भरवण्यात येणार असल्याची माहिती आत्माचे प्रकल्प
संचालकांनी दिली.
बाजारामध्ये
शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव, ग्राहकाला ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध
होईल अशी संकल्पना राज्यात सुरू करण्याच्या उद्देशाने विकेल ते पिकेल या
संकल्पनेवर आधारित संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार या अभियानाची सुरूवात करून
शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था व त्यासंबंधीची मूल्य साखळी संवर्धीत
करण्याचे नियोजन आहे.
यापुढील
प्रत्येक रविवारी सकाळी 9 ते दु. 1 वाजेपर्यंत आठवडी बाजार आयोजित करण्यात येणार
आहे. या बाजाराकरिता माल उपलब्ध करून देण्याचे तसेच ग्राहकांना ताजा भाजीपाला थेट
शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.