बुधवार, २० जानेवारी, २०२१

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सोमवारी मतदारांसाठी प्रतिज्ञा

 


 

कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) : 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ सर्व मतदारांना दिली जाते. त्यानुसार सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी या प्रतिज्ञेचे आयोजन करावे, अशी सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.

सर्व कार्यालन प्रमुखांना याबाबत पत्र पाठवले आहे. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने 18 वर्ष पूर्ण केलेल्या नवीन तरूण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे  व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे. राष्ट्रीय मतदार दिवशी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ सर्व मतदारांना दिली जाते. त्यानुसार कार्यालयामध्ये अधिकारी-कर्मचारी यांची शपथ घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित करावा. कोव्हिडबाबत सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे.

राष्ट्रीय मतदार दिवस मतदारांसाठी प्रतिज्ञा

 ‘‘ आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याव्दारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू अणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.’’     

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.