शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१

डीईआयईडी प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार

 


 

            कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : सन 2020-21 शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका (डीईआयईडी) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा विशेष फेरीव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी www.maa.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालकांनी केले आहे.

       प्रवेशाची शैक्षणिक पात्रता- इ. 12 वी उत्तीर्ण (खुला संवर्ग 49.5 टक्के व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग 44.5 टक्के गुणांसह) प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन भरणे) खुला संवर्ग 200 रूपये व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग 100 रूपये राहील.

          ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे दि. 11 ते 14 जानेवारी , पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी दि. 11 ते 15 जानेवारी, विद्यार्थ्यांनी स्वत:च्या लॉगीनमधून प्रवेश घ्यावयाचे अध्यापक विद्यालय निश्चित करून स्वत:चे प्रवेशपत्र काढून घेणे दि. 11 ते 16 जानेवारी व प्राचार्य, संबंधित अध्यापक विद्यालय यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रांची पडताळणी करून स्वत:चे लॉगीनमधून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश करून घेणे दि. 11 ते 20 जानेवारी.

           यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरून ॲप्रुव्ह करून घेतला आहे परंतु, प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेवू शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरूस्तीमध्ये आहे तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले असे सर्व उमेदवार अर्ज भरू शकतात. अर्ज ऑनलाईन ॲप्रुव्ह केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रकियेमध्ये विद्यार्थ्याने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करून लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल/लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या या व्दितीय विशेष फेरीनंतर प्रवेशासाठी कोणऱ्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही. सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.