गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

मोबाईल ॲपच्या माध्यमातून ‘स्वच्छता अभियान’ जनजागृती

 


कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : अस्वच्छ/ अनारोग्यकारक/ आरोग्यविघातक (insanitary) स्वरुपाची शौचालये शोधणे, अशी शौचालये बंद करणे, नागरिकांचे जीवन सुरक्षित व आरोग्यदायी बनविणे, हाताने मैला साफ करणाऱ्या सफाई कामगारांचे पुर्नवसन करणे जिल्ह्यातील मॅन्युअल स्कॅव्हेजरांचे पुर्नवसन करुन त्यांना जीवनात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ‘स्वच्छता अभियान’ या ॲपद्वारे जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्याधिकारी सर्व नगरपरिषद/ नगरपंचायत यांना दिल्या आहेत. 

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक इनसॅनिटरी लॅटरीनस् शोधणे व संपुष्टात आणने शहरातील सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील मॅन्युअल स्कॅव्हेजरांचे पुर्नवसन करुन त्यांना जीवनात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ‘स्वच्छता अभियान’ या ॲपद्वारे जनजागृती करावी. लोकांना उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सक्रीय सहभाग घेण्यासाठी मोबाईल अनुप्रयोगाबद्दल व्यापक धोरण निश्चित करावे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.