कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय): अनुसूचित
जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 2020-21 या शैक्षणिक
वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन
समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.
महाडीबीटी पोर्टलव्दारे पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर
शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता, शिक्षण शुल्क थेट वितरीत करण्यात येणार आहे. या
योजनेसाठी अर्ज भरण्याबाबत शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करावे तसेच
या योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभाविषयक माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहचवावी.
महाविद्यालयांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करावी व आपल्या संस्थेतील पात्र असणारा
एकही मागासवर्गीय विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची नोंद
घ्यावी.
संबंधित विद्यार्थ्यांनी अर्ज भरावयाची
कार्यवाही दि. 15 जानेवारी पर्यंत पूर्ण करावयाची आहे. अशा विद्यार्थ्यांची परिपूर्ण
स्वरूपातील अर्ज छाननी केलेले अर्ज महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
कार्यालयास ऑनलाईन सादर करावयाचे आहेत. महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीमधून
महाविद्यालयास देय असणारे शिक्षण शुल्क त्यांच्या खात्यावर अलहिदा जमा केले जाणार
आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी आकारणी करू
नये व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची पिळवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या
संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच याबाबत अडचण आल्यास 022-49150800 या टोल फ्री
क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.