मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

नमुना क्रमांक 08 स्वीकारण्यासाठी 24 ऑगस्टरोजी विशेष मोहीम - जिल्हाधिकारी दौलत देसाई



            कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेली होती. पूरस्थितीमध्ये जिल्ह्यातील जवळपास 375 गावे व 4 लक्ष लोक प्रभावीत झालेली आहेत. पूरस्थितीमध्ये नागरिकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी घुसल्याने घरातील महत्वपूर्ण कागदपत्रे/मतदार ओळखपत्रे खराब किंवा नष्ट झाल्याची शक्यता असल्याने दिनांक 24 ऑगस्ट रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर नमुना क्रमांक 08 स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.  दिनांक 24 ऑगस्टरोजी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदान केंद्रावर नमुना क्रमांक 08  स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.   
मतदारांना नव्याने PVC मतदार छायाचित्र ओळखपत्र (PVC EPIC) विनामोबदला उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम आयोजित केलेली आहे. ज्या मतदारांची PVC मतदार छायाचित्र ओळखपत्र (PVC EPIC) पूरस्थितीमुळे खराब किंवा नष्ट झालेली आहेत त्यांनी नव्याने PVC मतदार छायाचित्र ओळखपत्र (PVC EPIC) प्राप्त करण्यासाठी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO)/तलाठी यांचेकडे किंवा तालुक्यातील तहसिलदार कार्यालयातील, निवडणूक शाखा येथे किंवा आयोगाच्या https://www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने नमुना क्रमांक 08 (रंगीत छायाचित्रासह) सादर करावेत.
0  0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.