रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

आजअखेर 19 कोटी 78 लाख 20 हजार रुपये सानुग्रह वाटप जिल्ह्यात 414.95 टन मोफत गहू आणि तांदूळ वितरीत




          कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का.) : ग्रामीण भागातील 34 हजार 964 आणि शहरी भागातील 4 हजार 600 अशा एकूण 39 हजार 564 कुटुंबांना रोख 5 हजार रुपये याप्रमाणे आज अखेर 19 कोटी 78 लाख 20 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. 474 पूरबाधित गावांतील 41 हजार 495 कुटूंबाना प्रत्येकी 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ याप्रमाणे 414.95 टन मोफत गहू आणि तांदूळ वितरीत करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
            सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आलेली तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे - करवीर ग्रामीण 4 हजार 424 शहरी  599 कुटुंब 2 कोटी 51 लाख 15 हजार, कागल ग्रामीण 1 हजार 776 कुटुंब शहरी भागात 61 कुटुंब 91 लाख 85 हजार, पन्हाळा ग्रामीण  866 कुटुंब 43 लाख 30 हजार, शाहुवाडी ग्रामीण 397 शहरी 45 कुटुंब 22 लाख 10 हजार, हातकणंगले ग्रामीण  6 हजार 17 शहरी  1 हजार 103 कुटुंब 3 कोटी 56 लाख, शिरोळ ग्रामीण  19 हजार 905  शहरी  2 हजार 789 कुटुंब  11 कोटी 34 लाख 70 हजार राधानगरी ग्रामीण 747 कुटुंब 37 लाख 35 हजार, भुदरगड ग्रामीण 147 कुटुंब 7 लाख 35 हजार, गगनबावडा ग्रामीण 51 कुटुंब संख्या 2 लाख 55 हजार  व धनादेशाव्दारे 83 कुटुंबाना 4 लाख 15 हजार, गडहिंग्लज ग्रामीण 500 कुटुंब 25 लाख, आजरा ग्रामीण  38 व शहरातील 3 कुटुंब 2 लाख 5 हजार आणि चंदगड ग्रामीण 96 कुटुंबाना  4 लाख 80 हजार असे एकूण 19 कोटी 78 लाख 20 हजार अनुदानाचे वाटप करण्यात आले.
0000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.