कोल्हापूर, दि.
25 (जि.मा.का.) : ग्रामीण भागातील 50 हजार 484 आणि शहरी भागातील 20 हजार 635 कुटुंबांना
रोख 5 हजार रुपये प्रमाणे आज अखेर 35 कोटी 55 लाख 95 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान
वाटप तर धनादेशाद्वारे 6 लाख 85 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. अशी
माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
सानुग्रह
अनुदान वाटप करण्यात आलेली तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे - करवीर ग्रामीण 8 हजार
810 शहरी 9 हजार 44 कुटुंब 8 कोटी 92 लाख 70 हजार, कागल ग्रामीण 1 हजार
776 कुटुंब शहरी भागात 61 कुटुंब 91 लाख 85 हजार, पन्हाळा ग्रामीण 875 कुटुंब 43 लाख 75 हजार, शाहुवाडी ग्रामीण 399
शहरी 53 कुटुंब 22 लाख 60 हजार, हातकणंगले ग्रामीण 8 हजार 715 शहरी 5 हजार
79 कुटुंब 6 कोटी 89 लाख 70 हजार, शिरोळ ग्रामीण
27 हजार 763 शहरी 6 हजार 222 कुटुंब 16 कोटी 99 लाख 25 हजार, राधानगरी ग्रामीण 747 कुटुंब
37 लाख 35 हजार, भुदरगड ग्रामीण 147 कुटुंब 7 लाख 35 हजार, गगनबावडा ग्रामीण 101 कुटुंब
संख्या 5 लाख 5 हजार व 83 कुटुंबाना 4 लाख
15 हजार धनादेशाव्दारे जमा केले, गडहिंग्लज ग्रामीण 917 शहरी 168 कुटुंब 54 लाख 25 हजार, आजरा ग्रामीण 38 व शहरातील 8 कुटुंब 2 लाख 30 हजार व ग्रामीण
38 व शहरातील 8 कुटुंबाना 2 लाख 70 हजार धनादेशाव्दारे जमा केले आणि चंदगड ग्रामीण
196 कुटुंबाना 9 लाख 80 हजार असे एकूण 35 कोटी
55 लाख 95 हजार रुपयांचे रोख तर 6 लाख 85 हजार रुपयांचे धनादेशाद्वारे अनुदानाचे वाटप
करण्यात आले.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.