पुनर्वसन कार्यालयात अभ्यागतांसाठी आता
सोमवार व शुक्रवार हे दोन दिवस
कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : उपजिल्हाधिकारी
पुनर्वसन यांच्या कार्यालयामध्ये विविध कामांसाठी येणारे अभ्यांगत थेट कर्मचारी
यांचेशी संपर्क साधतात. अभ्यागतांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने
कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी पूरेसा वेळ देता येत नाही. यासाठी 1 ऑगस्ट पासून
अभ्यांगतांसाठी सोमवार व शुक्रवार हे दोन दिवस पूर्ण वेळ देण्यात येणार आहे. इतर
दिवशी सकाळी 10 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत कार्यालयीन कर्मचाऱ्यांशी संपर्क किंवा
भेटता येईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांनी दिली.
या कार्यालयामध्ये कामकाजासाठी येणाऱ्या अभ्यांगतांनी याबाबतची नोंद घ्यावी
असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
मंडप,
पेंडॉल तपासणीसाठी संनियंत्रण समिती गठीत
कोल्हापूर - 23 (जिमाका) : मुंबई उच्च न्यायालय
उपस्थित जनहित याचिका क्र.173/2010 अन्वये सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ याठिकाणी उभारण्यात
येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या तपासणीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातंर्गत व कोल्हापूर
महापालिका हद्दीमधील मंडप, पेंडॉल तपासणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे संनियंत्रण समिती
गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी यांनी दिली.
संनियंत्रण समिती
अध्यक्ष -सचिन इथापे उपविभागीय अधिकारी करवीर यांचा दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्र.
0231-2543337/9881002321 ई-मेल- sdokarvisdo@gmail.com,
सदस्य- धनंजय आंधळे प्र. उप आयुक्त महानगरपालिका कोल्हापूर यांचा दूरध्वनी व भ्रमणध्वनी
क्र. 0231-2542880/9766532012 ई-मेल- dmcmc02@gmail.com,
सदस्य- प्रेरणा कट्टे उपविभागीय पोलिस अधिकारी कोल्हापूर शहर यांचा दूरध्वनी व भ्रमणध्वनी
क्र. 0231-2543340/9423488597 ई-मेल- sdpocity.kop@mahapolice.gov.in
याप्रमाणे संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून, गणेशत्सव मंडळांनी याबाबतची दक्षता
घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.