कोल्हापूर
दि. 14 (जिमाका) : ज्यांची जनावरे पुरामध्ये
मृत्यूमुखी पडली आहेत अशा पूरग्रस्तांना 30 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. कृष्णा
खोरे महामंडळाच्या माध्यमातून अभ्यास करुन कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरभागात
वळवण्याचे विचाराधीन आहे, अशी माहिती सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी
दिली.
मदत
व पुनर्वसनमंत्री श्री. देशमुख यांनी आज शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील पूरग्रस्तांच्या
शिबीराला भेट दिली. याठिकाणी राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी, दत्तवाड, दानवाड, टाकळी,
भैरेवाडी, बसवाड, आक्कीवाट, कुरुंदवाड यागावातील पूरग्रस्त आणि जनावरांची व्यवस्था
करण्यात आली आहे. यावेळी गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष
माधवराव घाटगे, राहूल घाटगे, धीरज घाटगे आदी उपस्थित होते.
यागावातील
लोकांनी आमच्या गावाचे पुनर्वसन करावे अशी मागणी यावेळी केली. त्यावर ज्यांना घर नाही,
जो पूरगस्त आहे अशा लोकांसाठी स्वतंत्र गावठान करण्यात येईल, अशी ग्वाही श्री. देशमुख
यांनी दिली. लवकरच प्रत्येक कुटुंबाला 10 हजार
रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्यापैकी 5 हजार रुपये रोख स्वरुपात वाटप करण्यास
प्रारंभ करण्यात आला आहे. तसेच 10 किलो गहु, 10 किलो तांदुळही मोफत दिले जाणार आहे.
शासनस्तरावर पंचनामा करण्यास सांगण्यात आले असून ज्यांची जनावरे मृत झाली आहेत त्यांना
नुकसान भरपाई म्हणून 30 हजार रुपये देण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.
0 0 0
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.