कोल्हापूर, दि.
27 (जि.मा.का.) : आपत्तीमधून सावरणाऱ्या गावांमधील शेत मजूरांच्या उदरनिर्वाहासाठी
गाय किंवा म्हैस दानरुपातून देण्याचे नियोजन आहे. दानशूर व्यक्तींनी, सेवा संस्थांनी
तसेच सामाजिक संस्था यांनी पुढे यावे, आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
केंद्र
शासनाची एनडीआरएफ ची समिती 29 ऑगस्ट रोजी जिल्ह्यामध्ये येत असून ती आपत्ती ग्रस्त
भागाची पाहणी करणार आहे. या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज सायंकाळी सर्व
विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,
महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास,
निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी
माने आदी उपस्थित होते. आपत्ती ग्रस्त गावांमध्ये
शेती जमीन तसेच पिकांची हानी झाली आहे त्याचे 67 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.
31 ऑगस्टपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण होतील, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे
म्हणाले, पशुसंवर्धन विभागाने मृत जनावरांची गाव निहाय यादी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये
जाहीर करावी. यानंतर त्यांनी विविध विभागांच्या सद्यस्थिती आणि झालेल्या कामांचा सविस्तर
आढावा घेतला.
आपत्ती
ग्रस्त गावांमध्ये ग्रामपंचायतीकडून 10 गरीब शेतमजुरांची यादी घेण्यात येईल. या शेत
मजुरांना गाय किंवा म्हैस दान करुन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न
केला जाईल. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी
श्री. देसाई यांनी केले.
0 00 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.