रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

आर्ट ऑफ लिव्हिंगचा ट्रॉमा रिलीफ कँप आपत्तीशी सामना करण्याची क्षमता -जिल्हाधिकारी दौलत देसाई




       कोल्हापूर, दि. 25 (जिमाका)आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने पूरग्रस्तांना नवी उभारी देण्यासाठी  ट्रॉमा रिलिफ कँपचे सुरु केले आहे. अशा शिबिरांमधून कोणत्याही आपत्तीशी सामना करण्याची क्षमता निर्माण होते. अशी शिबिरे अन्य गावांमध्ये देखील घेण्यात येतील त्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक तो खर्च केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
            शिरोळ तालुक्यातील हसूर येथे प्रशिक्षक  विनायक  मुरदंडे यांनी घेतलेल्या  शिबिराच्या समारोपावेळी जिल्हाधिकारी मार्गदशन करत होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले प.पु.श्री. रविशंकरजी संस्थापित आर्ट ऑफ लिव्हिंगने या पुरामध्ये पूरग्रस्तांसाठी आणि जनावरांसाठी खूपच उल्लेखनीय सेवा केली आहे. पूरग्रस्त आपल्या घरी गेल्यावर उद्या पोटा पाण्याचे काय या प्रश्नाचा फार गहरा ताण प्रत्येकाच्या मनावर आहे. हा ताण तणाव जाऊन मन शांत होण्यासाठी, जीनाची उभारी पुन: प्राप्त होण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने अगदी पहिल्यापासून  ट्रॉमा रिलीफ कँप सुरु केले आहेत. 
            आपल्या जिल्ह्याला सर्वात जास्त मदत मिळाली. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्ह्यातला प्रत्येक माणूस पुराच्या पाण्यात उतरला. म्हणूनच आपण लवकर पूर्वपदावर येत आहोत. अशा शिबिरांमुळे कोणत्याही आपत्तीशी सामना करण्याची क्षमता प्रप्त  होते. अशी शिबिरे अन्य गावांमध्ये घेतली जातील त्यासाठी प्रशासनाच्यावतीने खर्च केला जाईल, असे ते म्हणाले. 
            संस्थेचे  प्रशिक्षक विनायक मुरदंडे यांनी  पुराच्या पाण्यामध्ये  जाऊन 22 खेड्यांमध्ये पशुखाद्याचे वितरण केले. त्याचबरोबर शिबिरही घेतले. यावेळी ज्येष्ठ प्रशिक्षिका डॉ राजश्री पाटील, आशा जैन उपस्थित होते. शेखर मुंदडा, अमोल येवले, संदिप शिरखेडकर आणि रोहन जैन यांच्या विशेष प्रयत्नामुळे पुणे, मुंबई, सोलापूर आणि इतर ठिकाणाहून मदत उपलब्ध झाली. कोल्हापूर महापालिका डॉ मल्लिनाथ कलशेट्टी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी  अधिकारी अमन मित्तल यांचे सहकार्य लाभले.
            आर्ट ऑफ लिव्हिंगची तीन दिवसांची  अशी शिबिरे चंदूर, इंगळी, रुई,निलेवाडी हालोंडी,जुने पारगाव,  दत् वाड, नृसिंहवाडी, खिद्रापूर या ठिकाणी पहिल्या टप्प्यात  होणार आहेत. रोज सायंकाळी 6 ते 9 यावेळेत होणाऱ्या शिबिरासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे. असे अव्हाण करण्यात येत आहे.
गुरुदत्त शुगर्स येथे एकावेळी चार हजार पेक्षा जास्त लोकांचे शिबिर घेण्यात आले आहे. राजश्री दिदी  डिंपल दिदी, सचिन मुधाळे, समीर बखले,आप्पा लाड, सुजाता इंगळे, पूनम  कुलकर्णी, आशिष आणि दिव्या चंदवाणी, डाँ अनिमा दहिभाते, गितांजली दिदी, महेश टकले, प्रवीण देशमुख, संजय देसाई, राजू एकांडे, किरण घोटणे, प्रताप पाटील, विनित पाश्चापुरे,राजू लकडे हे शिबिरे घेत आहेत
            डॉ. संयोगिता पाटील, मंदिर चव्हाण आणि हिमांशु मेहता यांनी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे घेवून औषधोपचार केले आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगने 25 हजार पेक्षा जास्त जीवनावश्यक  वस्तुंचे किट वितरीत केले आहेत. 50 ठिकाणी 500 लिटरच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.