कोल्हापूर, दि. 15 (जि.मा.का) : आजअखेर जिल्ह्यातील 18 हजार 57 पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5
हजार अशी 9 कोटी 1 लाख 80 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
पूरग्रस्त
कुटुंबांना ग्रामीण भागात 10 हजार आणि शहरी भागात 15 हजार रुपयांचे सानुग्रह
अनुदान देण्यात येत आहे. त्यापैकी 5 हजार रुपयांचा रोख वाटप करण्यात येत आहे. यात
ग्रामीण भागातील 15 हजार 565 आणि शहरी भागातील 2 हजार 492 अशा एकूण 18 हजार 57
कुटुंबांना 9 कोटी 1 लाख 80 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित
कुटुंबांनाही अनुदान वाटप सुरु आहे.
0 0 00 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.