मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

येत्या शनिवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा



        कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर व कोल्हापूर महानगरपालिका दि. अं. यो- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 02.30 पर्यंत देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, बिंदू चौक येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक संचालक ज.बा.करीम यांनी दिली.
      मेळाव्यास 8 वी, 10 वी ते पधवीधर, पदव्यूत्तर, एम. बी. ए. आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअर इत्यादी बेरोजगार उमेदवारांसाठी आयोजन केले असून या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील 21 उद्योजक उपस्थित राहून मुलाखतीव्दारे त्यांना आवश्यक विविध पात्रतेची 475 रिक्तपदांची भरती केली जाणार आहे. बेरोजगार उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा.  मेळाव्यात अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई या कर्ज योजनेची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
             मेळाव्याबाबतच्या अधिक माहिती व कर्ज  योजनांची माहिती www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. उमेदवारांनी मेळाव्याच्या ठिकाणी सहभागी होण्यासाठी आपला बायोडाटा तीन प्रतित घेऊन येणे आवश्यक आहे. पात्र पदांसाठी या वेबपोर्टलवर ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.