कोल्हापूर
दि.16 (जिमाका) :-जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच्या
काळात आतापर्यंत 369 गावांमधून 1 लाख 2 हजार 441 कुटुंबातील 4 लाख 7 हजार 134 व्यक्तींचे
सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी
दिली.
जिल्ह्यातील 369 गावांमधून 1 लाख 2 हजार 441 कुटुंबातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत
केलेल्या 4 लाख 7 हजार 134 व्यक्तींची तालुकानिहाय
माहिती पुढीलप्रमाणे आहे. शिरोळ – 42 गावातील
49 हजार 732 कुटुंबातील 1 लाख 84 हजार 4 सदस्य, कागल - 35 गावातील 1 हजार 856 कुटुंबातील
8 हजार 204 सदस्य, राधानगरी – 22 गावातील 757 कुटुंबातील 3 हजार 651 सदस्य, गडहिंग्लज
– 27 गावातील 1 हजार 561 कुटुंबातील 6 हजार 366 सदस्य, आजरा–24 गावातील 97 कुटुंबातील
374 सदस्य, भुदरगड – 19 गावातील 234 कुटुंबातील 972 सदस्य, शाहुवाडी – 25 गावातील
442 कुटुंबातील 2 हजार 151 सदस्य, पन्हाळा – 47 गावातील 935 कुटुंबातील 4 हजार 934
सदस्य, , हातकणंगले – 23 गावातील 21 हजार
329 कुटुंबातील 93 हजार 608 सदस्य, करवीर
– 56 गावातील 10 हजार 143 कुटुंबातील 52 हजार 982 सदस्य, गगनबावडा– 18 गावातील 87 कुटुंबातील
241 सदस्य, चंदगड – 30 गावातील 555 कुटुंबातील
2 हजार 644 सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून 14 हजार 713 कुटुंबातील 47 हजार 3 जणांचे
सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
००००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.