बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

राधानगरी अभयारण्य सभोवताल संवेदनशील क्षेत्र निर्मिती : हरकती पाठवा - विभागीय वनअधिकारी व्ही.आर.खेडकर



कोल्हापूर, दि. 14 (जि.मा.का.) : राधानगरी अभयारण्य सभोवताल पर्यावरण संवेदनशील क्षेत्र निर्मितीबाबतची प्रारूप अधिसूचना केंद्र शासनाकडून 10 जुलै 2019 रोजी प्रसिध्द केली आहे. या अधिसूचनेबाबत काही हरकती व सूचना अधिसूचना प्रसिध्द झाल्यापासून 60 दिवसांच्या आत पाठवाव्यात, असे आवाहन विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) व्हि.आर.खेडकर यांनी केले आहे.
      

       या अधिसूचनेची प्रत वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) व सहा.वनसंरक्षक (वन्यजीव) राधानगरी तसेच वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) राधानगरी व दाजीपुर यांच्या कार्यालयात जन सामान्यांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून ठेवलेली आहे.
          तरी या प्रारूप अधिसूचनेबाबत लोकांच्या काही हरकती अथवा सूचना असल्यास त्यांनी 10 जुलै 2019 पासून 60 दिवसांचे आत केंद्र शासनाचे सचिव, पर्यावरण जलवायु परिवर्तन मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोर बाग रोड, अलीगंज, नवी दिल्ली -110003 अथवा त्यांचे इमेल esz_mef@nic.in वर नोंदवाव्यात, किंवा वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), सहा.वनसंरक्षक (वन्यजीव) व वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) राधानगरी व दाजीपुर यांच्या कार्यालयामध्ये हरकती विहित वेळेत सादर कराव्यात, असे आवाहनही श्री. खेडकर यांनी केले आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.