मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

नेत्रदान पंधरवड्यानिमित्त जनजागृती फेरी संपन्न



 कोल्हापूर,दि. 27: (जि.मा.का.) : जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती (सी.पी.आर.) व  ज्ञानप्रबोधन भवन संचलित अंधशाळा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 34 व्या नेत्रदान पंधरवड्यानिमित्त काढण्यात आलेल्या जनजागृती फेरीचे उद्घाटन राजर्षि शाहु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
         यावेळी डॉ. लोकरे यांनी अंधमुलांच्या सुविधांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशराव बोंद्रे यांनी अंधशाळेबद्दल माहिती विषद केली. डॉ. केम्पीपाटील यांनी नेत्रदानाबाबत सविस्तर माहिती दिली.
         कार्यक्रमास वैद्यकीय अधिक्षक डॉ. सांगरूळकर, नेत्रविभाग प्रमुख डॉ. अतुल राऊत, डॉ.एस.के. अजेटराव, डॉ. अभिजीत ढवळे, एस.व्ही.चोकाकर, विनायक सुतार तसेच संस्थेचा शिक्षक-शिक्षकेत्तर स्टाफ, विद्यार्थी-विद्यार्थीनी व नागरिक उपस्थित होते.
        शेवटी अंधशाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी आभार मानले.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.