सुधारित
खाद्य वस्तूं विक्री करणाऱ्या
तीन एजन्सींवर जप्तीची कारवाई
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : उत्पादन
तारखेसाठी अतिरिक्त स्टिकर लावणे, ई-मल आयडी नसणे, निव्वळ वजनाचा उल्लेख नसलेल्या तीन
एजन्सींवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून, पुढील करवाई करण्यात येत आहे, अशी
माहिती वैध मापन शास्त्र सहायक नियंत्रक नरेंद्रसिंह मोहनसिंह यांनी दिली.
जिल्ह्यातील सध्याच्या पूरस्थितीत
विक्रेत्यांनी छापिल किंमतीपेक्षा जादा दर आकारुन विक्री केल्याचे प्रकार सुरु
होते. याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कालच कारवाईचे आदेश दिले होते. यानुसार वैध मापन शास्त्र विभागाने 27
आस्थापनाची तपासणी केली. यात श्रीकांत
इंडस्ट्रीज श्रीकृष्ण कॉलनी कळंबा यांनी ॲक्वामी 20 लिटर पाण्याच्या 2 नग किंमत 75
रुपये यावर अतिरिक्त स्टीकर लावून उत्पादन तारीख आणि बॅच नंबर लिहिण्यात आला होता.
यावर ई-मल आयडीचा उल्लेख नव्हता. श्री एजन्सीज अँड बेकर्स रेसकोर्स नाका,
संभाजीनगर यांच्या रॉयल केळी चिप्सवरही निव्वळ वजनाचा उल्लेख नव्हता तसेच उत्पादन
तारीखसाठी अतिरिक्त स्टीकर लावण्यात आले होते. सुप्रिम फूडस, सितालक्ष्मी नगर कोईमतूर
यांच्या रॉयल केळी चिप्सवर देखील निव्वळ वजनाचा उल्लेख नव्हता. तसेच उत्पादन
तारीखसाठी अतिरिक्त स्टीकर लावण्यात आले होते.
वरील तिन्ही एजन्सींवर कलम नियम 18(1)
नुसार कायदेशीर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.