रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

आजअखेर 375 गावांमधून 1 लाख 2 हजार 568 कुटुंबातील 4 लाख 7 हजार 578 जणांचे स्थलांतर -जिल्हाधिकारी दौलत देसाई




            कोल्हापूर दि. 18 (जिमाका)  : एकूण 375 गावांमधून 1 लाख 2 हजार 568 कुटुंबातील 4 लाख 7 हजार 578 व्यक्तींचे आजअखेर सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पाणी ओसरल्याने संक्रमण शिबीरातील पूरग्रस्थांनी आपल्या गावामध्ये मार्गक्रमण सुरु केले आहे. त्यामुळे आज एकूण 26 संक्रमण शिबीरात 2 हजार 337 पूरग्रस्त आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
            तालुकानिहाय कुटुंब आणि सदस्य संख्या पुढीलप्रमाणे - कागल - 36 गावातील 1 हजार 856 कुटुंबातील 8 हजार 204 सदस्य, राधानगरी – 22 गावातील 757 कुटुंबातील 3 हजार 3651 सदस्य, गडहिंग्लज – 27 गावातील 1561 कुटुंबातील 6 हजार 366 सदस्य, आजरा– 24 गावातील 97 कुटुंबातील 374 सदस्य, भुदरगड – 23 गावातील 244 कुटुंबातील 977 सदस्य, शाहुवाडी – 25 गावातील 442 कुटुंबातील 2 हजार 151 सदस्य, पन्हाळा – 47 गावातील 982 कुटुंबातील 4 हजार 934 सदस्य, शिरोळ – 42 गावातील 49 हजार 732 कुटुंबातील 1 लाख 84 हजार 4 सदस्य, हातकणंगले – 23 गावातील 21 हजार 329 कुटुंबातील 93 हजार 608 सदस्य, करवीर – 56 गावातील 10 हजार 154 कुटुंबातील 53 हजार 29 सदस्य, गगनबावडा– 19 गावातील 116 कुटुंबातील 520 सदस्य, चंदगड – 30 गावातील 585 कुटुंबातील 2 हजार 757 सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून 14 हजार 713 कुटुंबातील 47 हजार 3 जणांचे स्थलांतर करण्यात आले. जिल्ह्यात आज एकूण 26 संक्रमण शिबीरात 2 हजार 337 पूरग्रस्त आहेत. यामध्ये शिरोळमधील 11 शिबीरात 951, कोल्हापूर शहरातील 5 शिबीरात 408,  इचलकरंजी शहरातील 8 शिबीरात 800 आणि गडहिंग्लज मधील 2 शिबीरात 178 जणांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.