शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

कोल्हापूर पाटबंधारे उत्तर विभागाकडून 1 लाख 65 हजार 501 ची मदत




           
            कोल्हापूर दि 23 (जिमाका) पाटबंधारे उत्तर विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून 1 लाख 65 हजार 501 रुपयाचा धनादेश आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिला.
              पूरग्रस्तांना स्वेच्छेने आणि सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता रोहीत बांदिवडेकर यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत एकूण 47 अधिकारी कर्मचारी यांनी 1 लाख 65 हजार 501 रु जमवले. हा धनादेश आज त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे जमा केला. यावेळी कार्यकारी अभियंता रोहीत बांदिवडेकर, उप कार्यकारी अभियंता श्रीपती गुरव, सहायक अभियंता शशांक शिंदे, उपविभागीय अभियंता भाग्यश्री पाटील, शाखा अभियंता नाना पाटील आदी उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.