सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

...पाऊस झाला छोटा !




          कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2162.56 मिमी तर गेल्या 24 तासात सरासरी 2.43 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा-  तालुक्यात सर्वाधिक 8 मिमी पावसाची नोंद झाली. एकूणच जिल्ह्यातील आकडेवारी पाहता सगळीकडेच पाऊस झाला छोटा असेच म्हणावे लागेल.
          आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-

हातकणंगले- 7.50 मिमी एकूण 767.67 मिमी, शिरोळ निरंक एकूण 531.71 मिमी, पन्हाळा- 1.43 एकूण 2078.14 मिमी, शाहूवाडी- 7 मिमी एकूण 2432 मिमी, राधानगरी- 2.50 मिमी एकूण 2592 मिमी, गगनबावडा- 8 मिमी एकूण 5181 मिमी, करवीर- 0.64 मिमी एकूण 1590.45 मिमी, कागल- 0.29 मिमी एकूण 1703.29 मिमी, गडहिंग्लज- 0.43 मिमी एकूण 1303.57 मिमी, भुदरगड- निरंक मिमी एकूण 2310.80 मिमी, आजरा- 0.50 मिमी एकूण 2782.75 मिमी, चंदगड- 0.83 मिमी एकूण 2677.33 मिमी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.