सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड खात्यात मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 कोटी



कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयाने उघडलेल्या कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड या खात्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून आज 5 कोटी रूपये प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
       जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूर डिझास्टर  रिलिफ फंड या नावाने बँक ऑफ इंडियाच्या शाहूपुरी शाखेत खाते उघडण्यात आले आहे. याचा खाते क्रमांक 090110110018730 असा आहे. त्याचबरोबर आयएफएससी कोड BKID0000901 असा असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या खात्यामध्ये मदत जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले होते.
          मुख्यमंत्री सहायता निधीमधून या खात्यात 5 कोटी निधी प्राप्त झाला आहे. या निधीमधून स्वयंसेवी संघटनांमार्फत जे साहित्य पूरग्रस्तांना वितरीत करण्यात येणार आहे. त्याच्या वाहतुकीच्या इंधनावरील खर्च भागवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मृत जनावरांच्या विल्हेवाट लावण्यासाठी यामधून खर्च करण्यात येणार आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.