रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

शिर्डी संस्थानच्या वैद्यकीय पथकाकडून ५ हजारहून अधिक लोकांवर औषधोपचार निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे





            कोल्हापूर, दि. 18 (जिमाका)- पूरग्रस्तांना साथीचे रोग होवू नयेत म्हणून शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानतर्फे २५ जणांचे वैद्यकीय पथक १० लाख रुपयांच्या औषधांसह दाखल झाले होते. सुमारे ५ हजारहून अधिक लोकांची तपासणी करुन या पथकांने औषधोपचार केले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी आज दिली.
            मनोरमाच्या संचालक अश्विनी दानिगोंड यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसाठी शिर्डी संस्थानचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अध्यक्षांकडे मदत निधीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटीची मदत मिळाली.
          शिर्डी देवस्थानने २५ जणांचे वैद्यकीय पथक १० लाख रुपयांच्या औषधांसह  जिल्ह्यांसाठी पाठवले होते. मनोरमाच्या प्रतिनिधी सोनल शिर्के, देवस्थानचे डॉ. सचिन बागडे  यांच्या पथकांने दोन्ही जिल्ह्यांतील ५ हजाराहून अधिक पूरग्रस्तांची तपासणी करुन औषधोपचार केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.