कर
व दंड न भरलेल्या वाहनांचा 28 ऑगस्टला लिलाव
कोल्हापूर - 22 (जिमाका) : थकित मोटर वाहन करा अभावी व खटला विभागाच्या केसेससाठी
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहने अटकावून ठेवली आहेत. अशा वाहन मालकांनी कर व दंड
भरुन आपली वाहने ताब्यात घेण्याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आवाहन केले आहे.
वाहन मालकांना वारंवार
नोटीस पाठवूनही अद्याप ज्यांनी कर व दंड भरुन आपले वाहन ताब्यात घेतले नाही, त्यांनी आपल्या वाहनाबाबतचा कर व दंड दि. 28 ऑगस्ट
पूर्वी भरुन वाहन ताब्यात घ्यावे अन्यत: दि. 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता जाहिर लिलाव करण्यात येणार
आहे. आवाहन करण्यात आले आहे.
00000
पुणे
विभागीय ग्रंथालय समितीची
25 ऑगस्टला बैठक
कोल्हापूर - 22 (जिमाका) : महाराष्ट्र सार्वजनिक
ग्रंथालय अधिनियम 1967 व त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमांच्या
अनुंषगाने पुणे विभागातील ग्रंथालय विभागीय समितीची बैठक रविवार दि. 25 ऑगस्ट रोजी
सकाळी 11 वाजता पुणे मराठी ग्रंथालय, पत्र्या मारुती जवळ, नारायण पेठ, पुणे येथील सभागृहात
आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले.
पुणे विभागातील शासनमान्य
जिल्हा व तालुका सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष/कार्यवाह, ग्रंथपाल, सर्व जिल्हा ग्रंथालय
संघाचे अध्यक्ष/कार्यवाह, ग्रंथ, ग्रंथालय चळवळीतील लेखक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक,
मुद्रक, प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, वाचक, सभासद, विद्यापीठ, महाविद्यालयीन, शालेय ग्रंथपाल,
प्राध्यापक, ग्रंथालय संचालनालयातील माजी अधिकारी आदींनी या महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय
अधिनियम 1967 व त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमामध्ये काही सुधारणा
सुचवायच्या असतील, अशा व्यक्तींनी या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले
आहे.
000000
सातारा
सैनिक शाळेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
कोल्हापूर - 22 (जिमाका) : सैनिक शाळा सातारा
येथे इयत्ता 6 वी व 9 वी मध्ये प्रवेशसाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षासाठी ऑनलाईन
प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, दि. 5 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन
अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी
दिली.
इयत्ता
6 वी साठी विद्यार्थ्याचा जन्म 1 एप्रिल 2008 ते 31 मार्च 2010 या दरम्यान असावा, तर
इयत्ता 9 वी साठी विद्यार्थ्याचा जन्म 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2007 या दरम्यान असणे
आवश्यक आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया sainikschooladmission.in किंवा www.sainiksatara.org
या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथील 0231-2665812 या दूरध्वनी
क्रमांकारवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
पूरपरिस्थितीतील
रुग्णांना औषधांचा तुटवडा करु नये
कोल्हापूर
- 22 (जिमाका) : पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने
जिल्ह्यातील सर्व औषध दुकानातून रुग्णांना औषध उपलब्ध होतील त्याचा तुटवडा होणार
नाही, याबाबात औषध निरीक्षक यांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त म. स. जवंजाळपाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील औषध दुकानामध्ये
रुग्णांना औषधाचा तुटवडा होणार नाही, त्यांना लागणारी औषधे, Tetanus Toxoid Inj. चा
साठा दुकानामध्ये उपलब्ध करावा. मुदतबाह्य औषधे विकली जाणार नाहीत, औषधांच्या किंमती
जास्त प्रमाणात आकारली जाणार नाहीत याबाबतची रुग्णांनी काळजी यावी, तसेच अधिक माहितीसाठी
0231-2640573, 2641091 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले
आहे.
00000
माहे ऑगस्ट 2019 चे धान्य वाटप परिमाण
कोल्हापूर, दि. 22 : जिल्ह्यातील शहरी भाग आणि तालुक्यांसाठी ऑगस्ट 2019 करिता अंत्योदय योजनेंतर्गत प्रती कार्ड 23 किलो गहू प्रति किलो 2 रुपये दराने आणि प्रती कार्ड 12 किलो तांदूळ प्रति किलो 3 रुपये दराने वितरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील अंत्योदय कार्ड धारकांची संख्या 53082 आहे. तालुकानिहाय नियतनाची आकडेवारी क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोल्हापूर शहरातील गहू 710.93, तांदूळ 370.92, करवीर गहू 312.80, तांदूळ 163.20, पन्हाळा गहू 825.93, तांदूळ 430.92, हातकणंगले
गहू 1148.16, तांदूळ 599.04, इचलकरंजी गहू 1105.15, तांदूळ 576.60, शिरोळ गहू 1067.66, तांदूळ 557.04, कागल गहू 940.70, तांदूळ 490.80, शाहुवाडी गहू 743.36, तांदूळ 387.84, गगनबावडा गहू 202.17, तांदूळ 105.48, राधानगरी गहू 988.54, तांदूळ 515.76, गडहिंग्लज गहू
1327.10, तांदूळ 692.40, आजरा गहू 814.89, तांदूळ 425.16, चंदगड गहू 1382.07, तांदूळ 721.08, भुदरगड गहू 639.40, तांदुळ 333.60.
जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत लाभार्थीला प्रती कार्ड 3 किलो गहू प्रति किलो 2 रुपये दराने आणि प्रती कार्ड 2 किलो तांदूळ प्रति किलो 3 रुपये दराने वितरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची संख्या 2266130 आहे. तालुकानिहाय नियतनाची आकडेवारी क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोल्हापूर शहरातील गहू 8160.93, तांदूळ 5440.62, करवीर
गहू 9604.65, तांदूळ 6403.10, पन्हाळा गहू 5323.26, तांदूळ 3548.84, हातकणंगले
गहू 8706.60, तांदूळ 5804.40, इचलकरंजी गहू 3875.10, तांदूळ 2583.40, शिरोळ गहू 7360.80, तांदूळ 4907.20, कागल गहू 4936.92, तांदूळ 3291.82, शाहुवाडी गहू 4041.45, तांदूळ 2694.30, गगनबावडा गहू 542.04, तांदूळ 361.36, राधानगरी गहू 4012.14, तांदूळ 2674.76, गडहिंग्लज गहू 3394.35, तांदूळ 2262.90, आजरा गहू 2100.57, तांदूळ 1400.38, चंदगड गहू 2894.67, तांदूळ 1929.78, भुदरगड गहू 3030.42, तांदुळ 2020.28.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.