कोल्हापूर,दि. 27: (जि.मा.का.) : राष्ट्रीय क्रिडा
दिन तसेच हॉकी जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त फिट इंडिया मोहिम 29
ऑगस्तपासून राबविण्यात येणार असून या मोहिमेत जास्तीत जास्त युवकांनी सहभागी
व्हावे, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे समन्वयक के.के. घाटवळ यांनी केले आहे.
राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित् फिट इंडिया मोहिम देशभर राबविण्याची घोषणा
प्रधानमंत्री नरेंन्द्र मोदी यांनी नुकतीच मन की बात कार्यक्रमात केली. देशातील
प्रत्येक नागरिकाचे स्वस्थ उत्तम असावे, तसेच स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी या
मोहिमेत जिल्हयातील जास्तीतजास्त लोकांनी सहभागी व्हावे, तसेच नेहरू युवा
केंद्राशी संलग्न असणाऱ्या जिल्हयातील युवक मंडळांनी गावातील शाळा, सार्वजनिक
व्यायाम शाळा तसेच शालेय मैदाने या ठिकाणी गावस्तरावर एकत्र येवून मैदानी खेळात
सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वयक के.के. घाटवळ यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.