शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

पूरग्रस्तक्षेत्रातील सुक्ष्म व लघु उद्योगांच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरु




          कोल्हापूर दि.16 (जिमाका)  : पूरग्रस्त क्षेत्रातील सुक्ष्म लघु उद्योगांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतिश शेळके यांनी सांगितले.
            जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने पूरग्रस्त क्षेत्रातील सुक्ष्म लघु उद्योगांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सुक्ष्म,लघु उद्योग घटकांचे नुकसान झालेल्या घटकांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या सर्वेक्षण करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांकडे आवश्यक माहिती द्यावी.
             तसेच या सर्वेक्षणामध्ये सर्वेक्षण करते वेळेस आपला घटक बंद असल्यास किंवा माहिती दिली नसल्यास आपण जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन,कोल्हापूर या कार्यालयात संपर्क साधावा. या कार्यालयाचा दूरध्वनी (0231-655438/2667805) व्यवस्थापक एस.एस.दामले 9604430453,         उद्योग निरीक्षक अनिल मुद्दमवार 7385240444, विकास कुलकर्णी 7058508380, अमोल गुजर   7387037879 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही महाव्यवस्थापक सतिश शेळके यांनी केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.