कोल्हापूर,
दि. 13 (जि.मा.का.) : रमणमळा येथील
पूरग्रस्त कुटुबांना प्रत्येकी 5 हजाराचे सानुग्रह अनुदान जिल्हाधिकारी दौलत देसाई
यांच्याहस्ते आज वितरीत करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी,
अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब
यादव व प्रांताधिकारी सचिन इथापे उपस्थितीत होते.
याबरोबरच निलेवाडीतही पूरग्रस्त 430 कुटुंबातील
महिलांना सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच गगनबावडा तालुक्यातील
असळज, खोकुर्ले येथील 15 कुटुंबियांना, कागल तालुक्यातील अणूर, भुदरगड तालुक्यातील
शेनगाव, मडिलगे, तिरवडे, पेठ, शिवापूर येथील पूरग्रस्त कुटुंबांनाही आज सानुग्रह
अनुदानाचे वितरण करण्यात आले.
प्रशासनाच्यावतीने
पूरग्रस्त कुटुंबियांना 5 हजाराचे सानुग्रह अनुदान त्वरीत मिळाल्याबद्दल
पूरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.