गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

महापुरात मदतीच्या योगदानाबद्दल शनिवारी कृतज्ञता सोहळा सेवासंस्था,व्यक्तींनी उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन



                                                                               
        कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : जिल्ह्यात येवून गेलेल्या महापुरावेळी समाजातील विविध सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, तरूण मंडळे या सर्वांनी मदतीचे योगदान दिले आहे. या योगदानाबद्दल शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता येथील केशवराव भोसले नाट्यगृहात कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
       समाजातील सर्व स्तरातून महापुराच्यावेळी मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली. प्रत्येकजण आपल्यापरिने विविध माध्यमातून आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचे योगदान देत होते. प्रशासनाला मोठे सहकार्य लाभले आहे.  या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी होणाऱ्या या कृतज्ञता सोहळ्यास या सेवाभावी संस्था,व्यक्ती, तरूण मंडळे या सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.