कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : प्रधानमंत्री किसान मानधन
योजना (PMKMDY) देशातील सर्व लघु व सीमांत शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आहे. ही
योजना ऐच्छिक व अंशदायी स्वरुपाची असून यामध्ये 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी
समाविष्ट होऊ शकतात. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये
इतकी पेन्शन सुरु होते. ज्यांचे क्षेत्र 2 हेक्टर (5 एकर) पेक्षा कमी आहे, असे
शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेमध्ये सहभागी झाल्यास न्यूनतम सुनिश्चित पेन्शन व कुटुंब पेन्शन
होण्याचा फायदा होईल. या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी वय वर्षे 18-40 वयोगटातील लघु
व सीमांतर शेतकरी दि. 1 ऑगस्ट 2019 च्या स्थितीला अनुसरुन पात्र राहील.
राष्ट्रीय पेन्शन योजना, कर्मचारी
राज्य विमा योजना, कर्मचारी भविष्य निधी योजना किंवा इतर तत्सम संविधानिक
सुरक्षेच्या योजनेमध्ये सहभागी लघु व सीमांत शेतकरी, जे शेतकरी श्रम व रोजगार
मंत्रालय व्दारा संचालित प्रधानमंत्री श्रम योगी मानधन व प्रधानमंत्री लघु
व्यापारी मानधन योजनेमध्ये समाविष्ट आहे. बहुभुधारक, माजी-आजी संवैधानिक पद ग्रहण
करणारे, माजी-आजी मंत्री/राज्यमंत्री, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद
सदस्य, माजी-आजी महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती,
डॉक्टर, वकील इंजिनियर, सी. ए. वास्तुकार इत्यादी, केंद्र व राज्य शासनातील
कर्मचारी/अधिकारी (अपवाद वर्ग-4 व बहुउद्देशीय काम करणारे कर्मचारी) अपात्रत
रहातील.
एखाद्यी व्यक्ती या योजने मध्ये
सहभागी होण्यासाठी असत्य घोषणा पत्र करुन दिल्यास त्या व्यक्तीने भरलेले अंशदान
विना व्याज परत केले जाईल व केंद्र शासनाचे तेवढ्याच प्रमाणात असणारे योगदान
थांबवीले जाईल.
या योजने मध्ये 2 हेक्टर पेक्षा जास्त
क्षेत्र व 7/12 वर नस नसलेले शेतकरी या
मध्ये सहभागी होऊ शकत नाही. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी पती/पत्नीचे
नाव, जन्म दिनांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर, आधार नंबर व 7/12, 8 अ इत्यादी
कागदपत्रे आवश्यक आहे.
या योजनेचा पेन्शन कोष व्यवस्थापक
भारतीय जीवन विमा निगम असेल, या योजनेत भरावयाचे अंशदान पीएस-किसान मधून प्राप्त
होणाऱ्या लाभातून रक्कम भरता येऊ शकते. नाव नोंदणीची तारीख, अंशदान तिमाही,
चारमाही किंवा सहामाही स्वरुपात मासिक अंशदान देय तारीख असणार आहे.
आपले सरकार सेवा
केंद्रामध्ये (कॉमन सेवा केंद्र ) सर्व प्रपत्रे भरल्यानंतर अंशदान भरणाऱ्या
शेतकऱ्याची आवश्यक तेथे स्वाक्षरी घेवून पेन्शन कार्ड दिले जाईल, नाव नोंदणी
नि:शुल्क, चुकीच्या बँक खाते क्र. किंवा
इतर बाबत दुरुस्तीसाठी फक्त जन्म दिवस बदलता येणार नाही. या योजनेमध्ये कम्युटेशनची
सोय नाही. ऑनलाईन किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन कितीही वेळा वारसदार बदलता
येईल.
अधिक माहितीसाठी
सचिव (किसान कल्याण), कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण
मंत्रालय कृषी भवन, नवी दिल्ली-110001 या पत्त्यावर संपर्क साधावा.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.