मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

विधानसभा निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे -निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आगामी विधानसभा निवडणूकीच्या पुर्वतयारीचा घेतला आढावा




        कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का.): आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी निवडणूक यंत्रणेतील नोडल अधिकाऱ्यांसह सर्वच अधिकाऱ्यांनी परस्पर  समन्वय राखून विधानसभा निवडणूक कामकाज करावे, अशी सूचना निवासी  उपजिल्हाधिकारी  संजय शिंदे  यांनी केली.
            विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज नोडल अधिकारी आणि सहाय्य्क नोडल अधिकाऱ्यांची विशेष बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहुजी सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे  बोलत होते. बैठकीस अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, , उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांच्यासह नोडल अधिकारी आणि सहाय्य्क नोडल अधिकारी तसेच सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. घेऊन निवडणूकीच्या अनुषंगाने कामकाजाचा आढावा घेतला.
            आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था, बंदोबस्त, वाहतूक आराखडा, आचारसंहिता, प्रशिक्षण, व्यवस्थापन, मतदान कर्मचारी डाटाबेस, ईव्हीएम व्हीव्हीपॅट, निवडणूक साहित्य वाटप, वाहतुक व्यवस्था, निवडणूक खर्च परिक्षण, बॅलेट पेपर, मिडीया मॉनिटरींग, स्विप, निवडणूका निरीक्षक व्यवस्था अशा सर्वच समित्यांमार्फत करावयाच्या उपाययोजनांचा आढावा निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे  यांनी घेतला. ते म्हणाले, आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रीयेबाबत आतापासूनच सर्व समित्यांनी नियोजनाचा  सुक्ष्म आराखडा तयार करावा. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान केंद्रांची निश्चिती तसेच त्या मतदान केंद्रावर आवश्यक सोई-सुविधा प्राधान्याने उपलब्ध करण्याची सूचनाही त्यांनी केली.
            विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व प्रतिबंधक उपाययोजना यामध्ये संवेदनशिल, अतिसंवेदनशिल मतदान केंद्रे, आचारसंहितेचे पालन, पुरेसा पोलीस बंदोबस्त, होमगार्ड, एसआरपी, पुरेशी वाहने, आवश्यक असणारे स्कॉड, दैनंदिन अहवाल याची निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करावी, अशी सूचनाही श्री. शिंदे यांनी केली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना तसेच वेळोवेळी होणाऱ्या सुधारणा या सर्वांचा पोलीस आणि निवडणूक यंत्रणेतील सर्वच अधिकाऱ्यांनी अभ्यास करुन त्यानुसार कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.
            यावेळी आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राबविण्यात येणारी निवडणूक प्रक्रिया, मतदान केंद्रावरील अधिकारी/कर्मचाऱ्यांची नियुक्ती व  प्रशिक्षण, आदर्श आचारसंहितेचे पालन, कायदा सुव्यवस्था, ईव्हीएम / व्हीव्हीपॅट याचे प्रशिक्षण यासह निवडणुकीच्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या उपाययोजना तसेच घ्यावी लागणारी दक्षता याबाबतही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे  यांनी मार्गदर्शक सूचना केल्या.
            आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने सर्व यंत्रणांनी मतदार जागृतीच्या कामास प्राधान्य द्यावे. मतदार जागृतीसाठी जिल्हा, गाव  तसेच वाडी -वस्तीपर्यंत विशेष मोहिम हाती घेण्याची सूचनाही श्री. शिंदे यांनी केली.
            या बैठकीस जिल्हा पुनर्वसन अधिकारी वैभव नावडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस.टी. अल्वारीस, निवडणूक तहसिलदार श्रीमती गायकवाड यांच्यासह नोडल अधिकारी महानगरपालीकेचे मुख्य लेखा परीक्षक धनंजय आंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, शिवाजी विद्यापीठाचे लेखा व वित्त अधिकारी अजित चौगुले, एनआयसीचे संचालक चंद्रकांत मुगळी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी भूषण देशपांडे, बांधकाम  विभागाचे उपअभियंता धनंजय भोसले, आरटीओचे लेखाधिकारी बाबा जाधव, एनआयसीचे प्रताप पाटील, सहाय्यक पुरवठा अधिकारी अपर्णा मोरे, तहसिलदार (महसूल) शितल मुळे-भांमरे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.