कोल्हापूर, दि. 20 (जिमाका)
: महापूर येण्यापूर्वीची तयारी, आल्यानंतर प्रशासनाने
केलेले नियोजन आणि ओसरल्यानंतर सुरु असणारे मदत कार्य या विषयावर कोल्हापूर आकाशवाणीचे
कार्यक्रम अधिकारी प्रविण चिपळूणकर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मुलाखत घेतली
आहे. ही मुलाखत उद्या बुधवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजता कोल्हापूर आकाशवाणीवरुन
प्रसारीत होणार आहे.
पाऊस सुरु झाल्यानंतरच खबरदारीचा उपाय म्हणून
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केलेला दौरा, नागरिकांना कशा पध्दतीने सतर्क केले होते, प्रत्यक्ष
महापुरात जिल्हा प्रशासनाने कशा पध्दतीने परिस्थिती हाताळली, राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे
संचालक म्हणून केलेल्या कामाचा अनुभव कोल्हापूरमध्ये प्रत्यक्ष आपत्तीशी सामना करताना
कसा उपयोगात आणला. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना तरुण मंडळांनी काय दक्षता घ्यावी
याबाबत जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केलेले आवाहन अशा विविध विषयांवर ही मुलाखत
घेतली आहे. यावेळी केंद्र प्रमुख सतीश पडळकर
उपस्थित होते. ही मुलाखत उद्या रात्री
9.30 वाजता कोल्हापूर आकाशवाणीवरुन प्रसारीत होणार आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.