पूरग्रस्त
जनतेबरोबर जनावरांचीही काळजी
-पदुम मंत्री महादेव जानकर
कोल्हापूर,
दि. 12 (जिमाका) : अतिवृष्टीमुळे
आलेल्या महापुरात विस्थापित झालेल्या पूरग्रस्त जनतेच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहील, असे आश्वासन पशुसंवर्धन
व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी आज येथे दिले.
हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील
कन्या विद्या मंदिर शाळेतील पूरग्रस्त छावणीला आज पदुम मंत्री जानकर यांनी भेट
दिली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंर्धन अधिकारी डॉ. अरुण चौगुले, सहाय्यक
आयुक्त डॉ. विनोद पवार, डॉ. सुरेश कचरे, आप्पासाहेब सुतार, बाळासाहेब कुशाप्पा आदी
मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पदुम मंत्री महादेव जानकर म्हणाले, जनतेने
या आस्मानी संकटात घाबरुन न जाता या परिस्थितीला धैर्याने सामोरे गेले पाहिजे. या
संकटावर मात करण्यासाठी शासनही आपल्या बरोबर असून शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत
पुरविली जात आहे. पूरग्रस्त जनतेबरोबर जनावरांचीही काळजी शासनाकडून घेतली जात आहे.
यासाठी जनावरांच्या छावण्याही उभारल्या आहेत.
यावेळी पदुम मंत्री जानकर यांच्या हस्ते
पुरग्रस्तांना चहा व दुधाचे वाटपही करण्यात आले.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.