रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

जिल्ह्यात 188 संक्रमण शिबिरात 75 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची सोय -जिल्हाधिकारी दौलत देसाई


जिल्ह्यात 188 संक्रमण शिबिरात
75 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची सोय
-जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर, दि. 11 (जि.मा.का)  : जिल्ह्यातील 2 लाख 33 हजार 150 जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले असून 188 संक्रमण शिबिरामध्ये 75 हजाराहून अधिक व्यक्तींची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई  यांनी आज दिली. 
जिल्हयात सुरु असलेल्या 188 संक्रमण शिबिरामध्ये 75010 पूरग्रस्तांची व्यवस्था करण्यात आली असून संक्रमण शिबिरांची तालुकानिहाय माहिती अशी, करवीर तालुक्यात 8 संक्रमण शिबिरामध्ये 786 व्यक्ती आहेत, कोल्हापूर शहरामध्ये 28 संक्रमण शिबिरामध्ये 5870 व्यक्ती, शिरोळ तालुक्यात 81 संक्रमण शिबिरामध्ये 34631 व्यक्ती, हातकणंगले तालुक्यात 31 संक्रमण शिबिरामध्ये 20945 व्यक्ती, इचलकरंजीमध्ये 40 संक्रमण शिबिरामध्ये 12778 पूरग्रस्तांची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 249 गावे पूरबाधीत असून त्यांची लोकसंख्या 58690 इतकी आहे. यामध्ये करवीर तालुक्यातील 34 गांवे, शिरोळ तालुक्यातील 43 गांवे, हातकणंगले 18, उर्वरित 148 गावांचा समावेश आहे. पूर्णपणे पुराचा वेढा पडलेल्या गावांची सख्या 18 असून यामध्ये शिरोळ तालुक्यातील 9 गांवे, करवीर 3, हातकणंगले 5, गगनबावडयातील एका गावांचा समावेश आहे. वेढा पडलेल्या गावांची स्थलांतरित लोकसंख्या 47401 इतकी आहे. तर पुरामुळे बाधीत कुटुंब संख्या 47588 इतकी आहे. सद्या जिल्‍हयात 72 बोटी कार्यरत असून यामध्ये शिरोळ 47, करवीर 4, शहरात 8 आणि इतर 13 बोटींचा समावेश आहे. यासाठी 456 जवाण अहोरात्र काम करीत असल्याचेही जिल्हाधिकारी दौलत देसाई  यांनी स्पष्ट केले.
००००००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.