अलमट्टीतून 530000, कोयनेतून 53882 तर
राधानगरीतून 4256
क्युसेक विसर्ग
कोल्हापूर,
दि. 11 (जि.मा.का.) : अलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी
धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे खुले असून, त्यामधून 2856 क्युसेकने विसर्ग व विद्युत
विमोचकामधून 1400 असा एकूण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून
53882 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे
विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज सायंकाळी 4
वाजता दिली.
पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील
पाणी पातळी आज सायंकाळी 4 वाजता 49 फूट 11 इंच असून, एकूण 101 बंधारे पाण्याखाली गेले
आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.24 टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव
व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
पंचगंगा
नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी,
सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील- बाजारभोगाव, वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, यवलूज,
कांटे, करंजफेन व पेंडाखळे. तुळशी
नदीवरील- बीड, आरे व बाचणी. वारणा
नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव,
खोची व दानोळी. कडवी नदीवरील-
सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली,
सुळकुड, बाचणी, क.वाळवे, तुरूंबे व सुळंबी. कुंभी
नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे, मांडूकली, असळज, सांगशी व काताळी. वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरुपली,
बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव, चिखली, सुक्याचीवाडी, शेळोली,
तांबाळे, पाटगाव, दासेवाडी, अन.फ व
वाण्याचीवाडी. हिरण्यकेशी नदीवरील-
साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे, गजरगाव व दाबीळ. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी,
हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी
व ढोलगरवाडी. शाळी नदीवरील- येळावणे,
कोळगाव व टेकोली. धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे व पनोरे, चित्री नदीवरील कर्पेवाडी (करोली) असे एकूण 101 बंधारे पाण्याखाली
आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे
पाणीसाठा आहे. तुळशी 3.27 टीएमसी, वारणा 32.46
टीएमसी, दूधगंगा 23.72 टीएमसी, कासारी 2.57 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.52
टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.37, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22
टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे.
राजाराम 49.11 फूट, सुर्वे 48.6 फूट, रुई 79.3 फूट, इचलकरंजी 77 फूट, तेरवाड 81.4
फूट, शिरोळ 76.9 फूट, नृसिंहवाडी 76.9 फूट, राजापूर 62.9 फूट तर नजीकच्या सांगली 54.5 फूट आणि
अंकली 59.3 फूट अशी आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.