रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

पूर ओसरु लागला; शिरोळमधून दीड लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर 249 गावांमधून 50 हजार 594 कुटुंबातील 2 लाख 45 हजार 229 जणांचे स्थलांतर -जिल्हाधिकारी दौलत देसाई



          पूर ओसरु लागला; शिरोळमधून दीड लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर
249 गावांमधून 50 हजार 594 कुटुंबातील
2 लाख 45 हजार 229 जणांचे स्थलांतर                         
                 -जिल्हाधिकारी दौलत देसाई

            कोल्हापूर दि. 11 (जिमाका)  : पंचगंगेच्या पातळीत कमालीची घट झाल्याने पाणी ओसरु लागले आहे.  आजअखेर एकूण 249 गावांमधून 50 हजार 594 कुटुंबातील 2 लाख 45 हजार 229 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यात शिरोळ तालुक्यातील 42 गावामधून 31 हजार 38 कुटुंबातील 1 लाख 55 हजार 186 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
            तालुकानिहाय कुटुंब आणि सदस्य संख्या पुढीलप्रमाणे - कागल - 35 गावातील 1 हजार 848 कुटुंबातील 8 हजार 53 सदस्य, राधानगरी – 17 गावातील 558 कुटुंबातील 3 हजार 40 सदस्य, गडहिंग्लज – 15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य, आजरा– 22 गावातील 87 कुटुंबातील 333 सदस्य, भुदरगड – 14 गावातील 257 कुटुंबातील 1 हजार 31 सदस्य, शाहुवाडी – 6 गावातील 123 कुटुंबातील 489 सदस्य, पन्हाळा – 28 गावातील 405 कुटुंबातील 1 हजार 833 सदस्य, शिरोळ – 42 गावातील 31 हजार 38 कुटुंबातील 1 लाख 55 हजार 186 सदस्य, हातकणंगले – 21 गावातील 7 हजार 526 कुटुंबातील 33 हजार 723 सदस्य, करवीर – 35 गावातील 5 हजार 101 कुटुंबातील 26 हजार 433 सदस्य, गगनबावडा– 2 गावातील 50 कुटुंबातील 241 सदस्य, चंदगड – 11 गावातील 96 कुटुंबातील 516 सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून 2 हजार 569 कुटुंबातील 10 हजार 348 जणांचे स्थलांतर करण्यात आले.
                                    ००००००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.