जीवनावश्यक वस्तुंची जादा दराने विक्री
फौजदारी कारवाई करणार
-जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा इशारा
कोल्हापूर दि. 11 (जि.मा.का.) : जीवनावश्यक वस्तूंची
जादा दराने विक्री करणाऱ्यांवर तसेच अफवा फसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली
जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला.
जिल्ह्यातील
पूर परिस्थिती निवळत असून शहर व
जिल्ह्यातील जनतेस जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होत असल्याच्या तक्रारी
प्रशासनाकडे आल्या आहेत. कांही वस्तू उदा: पाणी, आगपेटी, मेणबत्ती, इंधन,
पालेभाज्या, दुध इत्यादी वस्तू एमआरपी पेक्षा
जादा दराने विक्री होत आहे.
जीवनावश्यक वस्तू जादा दराने
विक्री करणारे आढळल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी
यांनी दिले आहेत. याबाबत वजनेमापे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाची यंत्रणा अधिक
सक्रीय केली आहे. पूर परिस्थितीत
जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे असे भासवून जादा दराने वस्तूंची विक्री करणे तसेच
अशा स्वरुपाचे संदेश सोशल मिडियावर टाकून अफवा फसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
याबाबत पोलीस विभागही दक्ष असून पूरग्रस्तांसाठीच्या
मदतकार्य तसेच तक्रारींसाठी जिल्हास्तरावर
सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2655416
आणि 1077 असा आहे. जनतेने आपल्या तक्रारी
नियंत्रण कक्षाकडे कराव्यात असे आवाहनही जिल्हाधिकारी देसाई यांनी केले आहे.
जिल्ह्यात
एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबतही प्रशासन दक्ष असून आज सकाळी सात हजार गॅस सिलेंडर शिरोली नाका येथे आले
असून ती सिलेंडर व उर्वरित टँकर शहरात आणण्याची कार्यवाही प्राधान्याने करण्यात
येत असल्याने गॅस पुरवठा पुर्ववत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
पूरग्रस्तांसाठी
निर्माण केलेल्या संक्रमण शिबिराच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी
यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्याच्या
सूचना दिल्या आहेत. शहरातील अपार्टमेंट पाणी आले आहे अशा ठिकाणी चोरीच्या घटना घडू
नयेत यासाठी पोलीसांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरच
समाजमाध्यमातून कांही जण अफवा पसरवून
घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरही फौजदारी दाखल करण्याचे
निर्देश पोलीसांना दिले असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.
000000
महापुरामुळे बाधित
पशुधनाची छावण्यांमध्ये सोय
दोन लाख जादा लसींची
मागणी
जिल्हा पशुसंवर्धन
अधिकारी डॉ. विनोद पवार
कोल्हापूर दि. 11 (जि.मा.का.) : महापुराने जिल्ह्यातील पाच हजारहून अधिक पशुधन विस्तापित झाले
असून जवळपास चार हजार जनावरांची छावण्यांमध्ये सोय करण्यात आली आहे. या जनावरांना
आवश्यक औषधोपचार व लसीकरणास पशुसंवर्धन विभागाने प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात
औषधे व लसींचा पुरेसा साठा असून सुमारे दोन लाख जादा लसींची मागणी करण्यात
आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
डॉ. विनोद पवार यांनी दिली.
गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात पूर
परिस्थिती निर्माण झाली असून या पुरामुळे पुशधानाची मोठी हानी झाली आहे. प्राथमिक
अंदाजानुसार जवळपास 100 लहान मोठी जनावरे आणि सुमारे 5800 कोंबड्यांचा मृत्यू झाला
आहे. पूरहानीमुळे जिल्हयातील 6 तालुक्यातील 22 गांवातील पाचहजाराहून अधिक पशुधन
विस्तापित झाले असून यामध्ये शिरोळ तालुक्यातील 13 गावांतील 3320, हातकणंगले
तालुक्यातील 2 गावातील 300, भुदरगड तालुक्यातील 3 गावांतील 210, राधानगरी
तालुक्यातील एका गावांतील 40, पन्हाळा तालुक्यातील एका गावांतील शंभर, करवीर
तालुक्यातील 2 गावांतील 1050 पशुधनाचा समावेश आहे. तर पाच तालुकयातील 25 गावामधील जवळपास चार हजार
जनावरांसाठी पशुधनासाठी पशुसंवर्धन विभाग आणि स्वयंसेवी- सेवाभावी
संस्था-संघटनाच्या सहकार्यातून छावण्या उघडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कागल
तालुक्यातील 3 गावांमधील 220 जनावरे, हातकणंगले तालुक्यातील 5 गावांमधील 650
जनावरे, शिरोळ तालुक्यातील 5 गावांमधील 850 जनावरे, करवीर तालुक्यातील तालुक्यातील
2 गावांमधील 400 जनावरे आणि गडहिंग्जल तालुक्यातील 10 गावांमधील जवळपास दोन हजार
जनावरांचा समावेश आहे. स्थलांतरीत जनावरांच्या छावण्यामध्ये पशुधनाच्या
जोपासणेसाठी पशुसंवर्धन विभाग आणि स्वयंसेवी- सेवाभावी संस्था-संघटनाच्या
सहकार्यातून औषधोपचार आणि लसीकरणावर भर दिला आहे.
00000
लेखा क्र. 15
महापुरातही
मुक्या प्राण्याची काळजी
जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे पशुधनही बाधित झाले आहे.
शेतकऱ्याच्या या पशुधनाची काळजी घेण्याचे पशुसंवर्धन विभागाने सुरु केले असून
छावण्यांमध्ये व अन्य ठिकाणी विस्तापित झालेल्या पशुधनास आवश्यक औषधोपचार,
लसीकरणास प्राधान्य दिले आहे.
|
महापुरात माणसांबरोबरच मुक्या
जनावरांचीही मोठया प्रमाणात हानी झाली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार
महापुरामुळे शंभरहून अधिक लहानमोठी जनावरे दगावली असून सहाहजाराच्या आसपास कोंबडया
मृत्यूमुखी पडल्या आहेत. पुरामुळे वाहून गेलेल्या जनावरांची माहिती संकलीत
करण्याचे कामही सुरु आहे. मात्र जवळपास 5 हजाराहून अधिक पशुधन विस्तापित झाले असून
सुमारे 4 हजार जनावरे स्थलांतरीत असून त्यांची व्यवस्था छावण्यामध्ये करण्यात आली
आहे. या सर्व पशुधनासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत सुमारे शंभरहून अधिक
डॉक्टरांच्या मदतीने औषधोपचार आणि लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुराच्या
काळात जनावरांमध्ये उदभवणाऱ्या प्रामुख्याने फऱ्या आणि घटसर्प या रोगाचा प्रतिबंध करणाऱ्या
लसींची पुरेशी मात्रा असून भविष्यात या संसर्गजन्य आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी
आणखीन 2 लाख लसींची मागणी नोंदवीली
आहे.
शेतकऱ्यांचा जीव की प्राण म्हणजे
त्यांचे पशुधन ! जीवापाड जोपासलेलं हे पशुधन जगविण्याचा अतोनात प्रयत्न पुराच्या काळातही नागरिकांनी केला आहे.
यंदाच्या महाप्रलयकारी महापुराने जीवापाड जोपासलेल्या पशुधनासही लोकांना मुकावं
लागलं आहे. पण आपला स्वत:चा जीव वाचविण्याच्या धडपडीत पशुधनही वाचविण्याचा अटोकाट
प्रयत्न लोकांनी केला आहे. तरीही कित्तेक जनावरांना लोकांना मुकावं लागलं आहे.
पूरबाधित गांवातील जे काही पशुधन वाचलयं त्यांची काळजी घेणं आता गरजेचे आहे.
म्हणूनच शासन आणि जिल्हापरिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांसाठी आवश्यक
औषधोपचार आणि लसीकरणावर सर्वार्थाने भर दिला आहे. सर्वच जनावरांचे लसीकरण करण्याची
विशेष मोहिम हाती घेतली असून पूरबाधित जनावरांच्या छावण्याच्याठिकाणी एका
डॉक्टराचे पथक तैनात केले असून पूरबाधित गावांसाठी विषेश वैद्यकीय पथके स्थापन
करुन जवळपास शंभर ते सव्वाशे डॉक्टर्स आणि स्टाफ तसेच जिल्हयातील स्वयंसेवी-
सेवाभावी संस्था-संघटनाबरोबरच खाजगी पशु वैद्यकीय अधिकारीही सक्रीय झाले आहेत.
जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या
मार्गदर्शनाखाली जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार आणि त्यांची टीम
कार्यरत आहे.
पुरहानीमुळे जिल्हयातील 6 तालुक्यातील
22 गांवातील पाचहजाराहून अधिक पशुधन विस्तापित झाले असून यामध्ये शिरोळ
तालुक्यातील 13 गावांतील 3320, हातकणंगले तालुक्यातील 2 गावातील 300, भुदरगड
तालुक्यातील 3 गावांतील 210, राधानगरी तालुक्यातील एका गावांतील 40, पन्हाळा
तालुक्यातील एका गावांतील शंभर, करवीर तालुक्यातील 2 गावांतील 1050 पशुधनाचा
समावेश असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी सांगितले. या
विस्तापित पशुधनासाठी पशुसंवर्धन विभाग आणि स्वयंसेवी- सेवाभावी संस्था-संघटनाच्या
सहकार्यातून औषधोपचार आणि लसीकरण करण्यात येत आहे.
महापुरामुळे बाधित गावातील जनावरांचे
सुरक्षित ठिकाणी स्थलांरत केले असून पाच तालुकयातील 25 गावामधील जवळपास चार हजार
जनावरांसाठी पशुधनासाठी पशुसंवर्धन विभाग आणि स्वयंसेवी- सेवाभावी
संस्था-संघटनाच्या सहकार्यातून छावण्या उघडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कागल
तालुक्यातील 3 गावांमधील 220 जनावरे, हातकणंगले तालुक्यातील 5 गावांमधील 650
जनावरे, शिरोळ तालुक्यातील 5 गावांमधील 850 जनावरे, करवीर तालुक्यातील तालुक्यातील
2 गावांमधील 400 जनावरे आणि गडहिंग्जल तालुक्यातील 10 गावांमधील जवळपास दोन हजार
जनावरांचा समावेश आहे. स्थलांतरीत जनावरांच्या छावण्यामध्ये पशुधनाच्या
जोपासणेसाठी पशुसंवर्धन विभाग आणि स्वयंसेवी- सेवाभावी संस्था-संघटनाच्या
सहकार्यातून औषधोपचार आणि लसीकरणावर भर दिला आहे.
महापुरामुळे बाधित गावातील
जनावरांसाठी पशुसंवर्धन विभाग आणि स्वयंसेवी- सेवाभावी संस्था-संघटनाच्या
सहकार्यातून काम सुरु असून पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पुण्याहून दोन पथके दाखल
झाली असून ती शिरोळ परिसरात कार्यरतआहेत. याशिवाय पशुसंवर्धन विभागाच्यावतीने
जवळपास 12 विशेष पथकेही कार्यरत आहेत. स्थलांतरीत जनावरांच्या छावण्यामध्ये
पशुधनाच्या जोपासणेसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत औषधोपचार आणि लसीकरणावर अधिक लक्ष
केंद्रीत केले असून पुरेशी औषधे आणि लसींची मात्रा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी जीवापाड जोपासलेलं पशुधन वाचविण्यावर पशुसंवर्धन विभागाने सर्वाधिक
लक्ष केंद्रीत केले आहे.
-एस.आर.माने
-सेवानिवृत्त माहिती अधिकारी,
-कोल्हापूर.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.