जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर परिस्थितीची पाहणी;
परिस्थिती नियंत्रणात
अलमट्टीमधून
विसर्ग वाढविण्यासाठी विनंती
- जिल्हाधिकारी दौलत देसाई
` कोल्हापूर, दि. 1 (जि.मा.का.) : गेल्या तीन दिवसात
पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणं भरली आहेत. नदया दुथडी भरुन वाहत आहेत.
अलमट्टी धरणामधून 2 लाख 17 हजार क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. हा विसर्ग आणखी
वाढविण्यासाठी राज्य
शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवांकडे विनंती केली आहे. जिल्ह्यातील
परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी
श्री. देसाई यांनी शहरालगतच्या केर्ली, प्रयाग चिखली, आंबेवाडी याठिकाणी आज
सायंकाळी 4 च्या सुमारास भेट देवून पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे,
तहसिलदार सचिन गिरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलीत दरवाजे उघडल्याने एकूण 7 हजार 112
क्युसेक्स पाण्याची विसर्ग होत आहे.
त्याचबरोबर वारणा धरणातलं 25 क्युसेक्स इतका विसर्ग सुरु झाला आहे. भोगावती नदीला
आलेल्या पुरामुळे आणि सध्याच्या पावसाची परिस्थिती पाहता बालिंगे पूल वाहतुकीस बंद
करण्यात आला आहे. गांधीनगर, चिंचवड रस्ता चिंचवड फाट्याच्या पुढे बंद झाला आहे.
सुतारवाडा येथील 41 लोकांचे येथील चित्रदुर्ग मठात स्थलांतर केले आहे. गगनबावडा मौजे
किरवे, लोंघे याठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. रात्री 8
वाजता राजाराम बंधारा येथील पाणी पातळी 42.2 इंच इतकी झाली आहे.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी पूर
परिस्थितीची पाहणी करुन माहिती दिली, ज्या
रस्त्यांवर पाणी आले आहे, ते रस्ते वाहतुकीला बंद ठेवून पर्यायी मार्गाने वाहतूक
सुरु ठेवली आहे. अलमट्टी धरणामध्ये 1 लाख 50 हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत
असून, 2 लाख 17 हजार क्युसेक्सचा विसर्ग अलमट्टीमधून पुढे होत आहे. हा विसर्ग
वाढविण्यासाठी विनंती केली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून स्थानिक प्रशासन
त्यासाठी सज्ज आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.