कोल्हापूर, दि. 1 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील
सैन्यातून सेवानिवृत्त माजी सैनिकांच्या पाल्यांना दिवंगत सेवारत सैनिकांच्या
पत्नी व त्यांचे पाल्य व दुसऱ्या महायुध्दातील लाभार्थी, त्यांच्या विधवा व माजी
सैनिक अपंग पाल्यांना आर्थिक वर्ष 2019-20 साठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
दिनांक 10 ऑगस्ट 2019 पर्यंत जिल्हा सैनिक कार्यालय, येथे कागदपत्रे व अर्ज सादर
करावेत, असे आवहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासने यांनी केले.
येताना मोबाईल नंबर,
डिसचार्ज पुस्तक, ओळखपत्र, पीपीओ ची छायांकित प्रत घेऊन यावी. अधिक माहितीसाठी
जिल्हा सैनिक कार्यालय, लाईन बाझार, कसबा बावडा येथे दूरध्वनी क्रमांक 0231-2665812
यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.