सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

बालदिनानिमित्त चाईल्डलाईनतर्फे विविध कार्यक्रम संपन्न/ टपाल विभागाची 10 डिसेंबर रोजी डाक अदालत


बालदिनानिमित्त चाईल्डलाईनतर्फे विविध कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर - 25 (जिमाका) : चाईल्डलाईन हा केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकारचा हा उपक्रम आहे. चाईल्डलाईन या संस्थेमार्फत दरवर्षी लैगिंक शोषणास बळी पडलेल्या, हरवलेल्या, वैद्यकिय मदतीची गरज असलेल्या, अनाथ, निराधार बेवारस, बालकामगार, बालविवाह, भावनिक आधाराची गरज असलेल्या व निवाऱ्याच्या शोधात असलेल्या अशा विविध घटकातील मुलांना आधार दिला जातो. गुरुवार दि. 14 नोव्हेंबर ते गुरुवार दि. 21 नोव्हेंबर 2019 या कालावधीत बालदिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती चाईल्डलाईनच्या समन्वयक अनुजा खुरंदळ यांनी दिली.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी 14 नोव्हेंबर रोजी पोस्टर व घोषणांच्या माध्यमातून जनजागृती, पथनाट्याद्वारे मुलांच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. हे पथनाट्य भवानी मंडप, शिवाची चौक, बिंदू चौक, व रेल्वेस्टेशन येथे सादर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी दिनांक 15 नोव्हेंबर  रोजी सरकारी यंत्रणांना भेटी देण्यात आल्या.  यावेळी जिल्हाधिकारी  दौलत देसाई, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  बी. जी. काटकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अधिक्षिका श्रीमती कट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, वैद्यकीय अधिक्षिका डॉ. तेजस्विनी सांगरुळकर, बाल न्याय मंडळ सदस्य प्रियदर्शनी चोरगे, श्री. देशपांडे, महिला व बालकल्याण विभागचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, बाल कल्याण समिती सदस्य अंगडी, डॉ. जोतिराम पवार, श्री. शेटे सर, तसेच कन्या निरीक्षण गृहच्या प्रमुख अधिक्षिका पद्मजा गारे, जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश माने, सरकारी कामगार अधिकारी  वाय. एम. हुंबे, शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कटकधोंड आदी मान्यवर उपस्थित राहून सर्वानी चाईल्डलाईन च्या पुढील कार्याला खूप शुभेच्छा दिल्या.
            बालदिन सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी  दिनांक 16 नोव्हेंबर  रोजी या आणि खेळा  हा कार्यक्रम रेल्वे स्टेशन आणि रंकाळा चौपाटी येथे घेण्यात आला. विविध मान्यवर उपस्थित राहून लहान मुलांसोबत मोठ्यांनीही आपले बालपण पुन्हा एकदा जागृत करुन, चाईल्डलाईनच्या  1 हजार 98 मुलांना  त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली. चौथ्या दिवशी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी  छत्रपती गार्डन, रमण मळा न्यू पॅलेस एरिया येथे मुलांसोबत खेळ घेऊन गप्पा मारत त्यांच्या समस्या मन कि बात या कार्यक्रमाद्वारे जाणून घेतल्या. पाचव्या  दिवशी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी चाइल्डलाईनचा पुढील कार्यक्रम दोस्ती कॉर्नर हा न्यू कॉलेज, सिद्धाळा गार्डन, गोखले कॉलेज, हुतात्मा गार्डन, भवानी मंडप या परिसरामध्ये  पार पडला.  यावेळी मुलांना चाइल्डलाईन बद्दल माहिती सांगून त्यांना चाइल्डलाईनचे मित्र बनविण्यात आले.  सहाव्या  दिवशी  दिनांक 19 नोव्हेंबर 2019 रोजी  चाईल्डलाईन आयोजित कॉलेज सेन्सिटायझेशन प्रोग्राम हा सोशल वर्क डिपार्टमेंट शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे करण्यात आला. दरम्यान विद्यार्थ्यांनी बाल कामगार, बाल भिक्षेकरी, बाल विवाह आणि शारीरिक व लैंगिक शोषण ह्या विषयांवर पोस्टर प्रेझेंटेशन केले. कार्यक्रमासाठी चाईल्डलाईनच्या केंद्र समन्वयक अनुजा खुरंदळ, रेल्वे चाईल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक वीरसेन साळोखे  व सहाय्यक प्राध्यापक अमोल मिंचेकर आदी उपस्थित होते.
            बालदिन सप्ताहाच्या सातव्या दिवशी  दिनांक 20 नोव्हेंबर रोजी  श्री गणेश विद्यालय, प्रयाग चिखली येथे बालदिन सप्ताहातील स्वच्छता अभियान हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी श्री गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस. आर. पाटील, सरपंच  उमा पाटील शाळेचे मुख्याध्यापक एम.पी.कांबळे, चाईल्डलाईनच्या केंद्र समन्वयक अनुजा खुरंदळ आदी उपस्थित होते. आठव्या  दिवशी  दिनांक 21 नोव्हेंबर 2019 रोजी  महाराष्ट्र भटकी जमात जनता सेवक संघ, पेठ वडगाव संचलीत प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा येथे बालदिन सप्ताहातील चिल्ड्रन पार्टी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री. आर. माळी  मुख्याध्यापक यांनी चाईल्डलाईन च्या पुढील कार्याला खूप शुभेच्छा दिल्या. सांगली मिशन सोसायटीचे सामाजिक कार्य व विकासचे संचालक फादर रोशन वर्गीस यांनी सांगली मिशन सोसायटी मार्फत आश्रम शाळेला मदत करण्याचे आवाहन केले आणि चाईल्डलाईन टीमचे अभिनंदन केले
00000

टपाल विभागाची 10 डिसेंबर रोजी डाक अदालत
कोल्हापूर - 25 (जिमाका) : कोल्हापूर अधीक्षक डाक घर येथे मगंळवार दि. 10 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक डाकघर यांनी दिली.
 जिल्ह्यातील डाक विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्धल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नाही, समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींचे या डाक अदालतीमध्ये विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते व प्रमाणपत्र आदीबाबतच्या तक्रारी या डाक अदालतीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. तरी तपशिलासहीत तक्रारी दोन प्रतीत आय.डी. पाटील प्रवर अधीक्षक डाकघर कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या नावे दिनांक 2 डिसेंबर 2019 रोजी पोहचतील या बेताने पाठविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.   
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.