बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९

वृध्द साहित्यिक व कलावंतानी मानधनासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत - डॉ. रवि शिवदास



कोल्हापूर, दि. 13 (जि.मा.का.): जिल्ह्यातील पात्र वृध्द साहित्यिक व कलावंत यांनी मानधन मिळण्यासाठी संबंधित पंचायत समितीमध्ये येत्या 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवि शिवदास यांनी केले आहे.
          राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत यांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राष्ट्रीय कलावंत (अ वर्ग) यांना दरमहा 3 हजार 150, राज्यस्तरीय कलावंत (ब वर्ग) यांना दरमहा 2 हजार 700 रूपये व स्थानिक कलावंत (क वर्ग) यांना दरमहा 2 हजार 250 इतके मानधन देण्यात येते. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी 100 कलाकारांना जिल्हास्तरीय समितीतर्फे निवड करून राज्य शासनाकडे शिफारस केली जाते.
00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.