कुरुंदवाडमधील 5 हजार 661 पूरग्रस्त कुटुंबियांच्या
खात्यावर
6 कोटी 4 लाख 86 हजार 840 अनुदान जमा
- डॉ. विकास खरात
कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 4 : शिरोळ
तालुक्यातील कुरुंदवाडमधील 5 हजार 661 पूरबाधित कुटुंबियांच्या खात्यावर 6 कोटी 4
लाख 86 हजार 840 रु प्रत्यक्ष अनुदान जमा करण्यात आले आहे. उर्वरित 26 पूरग्रस्त
कुटुंबियांच्या खात्यावरही 3 लाख 14 हजार 600 इतके अनुदान लवकरच वर्ग होतील, अशी
माहिती इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.
शिरोळ तहसिल कार्यालयात कुरुंदवाडमधील
बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, अर्बन बँक, रत्नाकर बँक, के डी सी सी, नांदणी सहकारी
बँक अशा विविध 11 बँकांच्या शाखाधिकारी यांच्याबरोबर आज आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत पूरग्रस्तांना प्राप्त झालेल्या सहनुग्रह तसेच निर्वाह भत्ता वाटपाचा
आढावा डॉ. खरात यांनी घेतला. तहसीलदार डॉ. आपर्णा मोरे-धुमाळ यावेळी उपस्थितीत
होत्या.
एकूण 5 हजार 687 पूरग्रस्त कुटुंबियांना देण्यात आलेल्या 6 कोटी 8 लाख 1
हजार 440 रुपये अनुदानापैकी 5 हजार 661 कुटुंबियांच्या खात्यावर 6 कोटी 4 लाख 86
हजार 840 इतके अनुदान प्रत्यक्ष जमा केले आहे. खाते क्रमांक
बंद असणे अथवा खाते क्रमांक न जुळल्यामुळे फक्त 26 पूरग्रस्त कुटुंबियांच्या
खात्यावर 3 लाख 600 रुपये इतके अनुदान वर्ग करणे शिल्लक राहिले आहे.
संबंधित खातेदारांना खाते सुरु
करण्याची सूचना दिल्याचे केडीसीसी चे व्यवस्थापक शिवाजी कारंडे, बँक ऑफ इंडियाचे
शाखाधिकारी प्रदीपकुमार भोयाम यांनी सांगितले.
शिरोळ तालुक्यामधील 37 हजार 707
पूरबाधित कुटुंबियांचे संपूर्ण सानुग्रह अनुदान आणि निर्वाह भत्ता सर्व बँकांमध्ये
जमा केलेला आहे. बँकांमार्फत पूरग्रस्त कुटुंबियांच्या खात्यावर प्राप्त अनुदान
वर्ग करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. 2082 बाधित गोठयांचे 62 लाख 46 हजार
रुपये, 2 हजार 396 कुटुंबियांच्या घरभाड्याचे 6 कोटी 29 लाख 88 हजार रुपये आणि 4
हजार 46 व्यापारी दुकानांच्या नुकसानीबाबत 14 कोटी 36 लाख 57 हजार 280 इतके अनुदान
बँकेमध्ये जमा केले आहे, अशी माहिती डॉ. खरात यांनी दिली.
ज्या पूरबाधित
कुटुबियांचे खाते क्रमांक जुळत नाहीत अशांनी संबंधित तलाठ्यांकडे दुरुस्त खाते
क्रमांक द्यावेत असे, आवाहन तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी केले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.