कोल्हापूर,
दि. 25 (जि.मा.का.) : एनसीसी गट कोल्हापूरच्यावतीने गुरूवार दि. 28 नोव्हेंबरपासून
पन्हाळा ते विशाळगड असा छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेक शिबिराला सुरुवात होणार आहे. 28,29,30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2019 अशा चार बॅचेसमध्ये छत्रपती
शिवाजी ट्रेल ट्रेक आयोजित केला आहे. यामध्ये देशातील तसेच विदेशातील एनसीसी छात्र
सहभागी होणार आहेत, अशी माहिती ग्रुप कमांडर ब्रिगेडीयर आर.बी. डोगरा यांनी दिली.
छत्रपती शिवाजी
ट्रेल ट्रेक हा राष्ट्रीय स्तरावरील
ट्रेकिंग शिबिर असून यामध्ये देशभरातील एनसीसी छात्रांबरोबरच अन्य देशातील
छात्रांचाही सहभाग असणार आहे. दिनांक छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेक साठी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील आर्मीतील
तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने पन्हाळा
किल्ल्यावरून आपली सुटका करून घेतली होती. इतिहासातील या प्रसंगाला स्मरून छत्रपती
शिवाजी ट्रेल ट्रेक हे नाव या शिबिराला देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत सह्याद्रीच्या टेकड्यांमध्ये ट्रेकिंग
केल्यामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारशाची झलक
छात्रांना मिळते. विदेशातील तसेच परराज्यातील एनसीसी छात्रांना येथील मराठा
इतिहास, स्थानिक चालीरिती आणि संस्कृतीची देखील माहिती या ट्रेकमधून मिळते.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.