सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१९

वर्ल्ड हेरिटेज सप्ताह आजपासून विविध कार्यक्रम



       कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का) : वर्ल्ड हेरिटेज सप्ताहानिमित्त दिनांक 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्हयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून यामध्ये हेरिटेज साईट भेटसह हेरिटेज वॉक, छायाचित्रण स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासन आणि  हेरिटेज कॉन्झव्हेशन कमिटी आदी संस्थांच्या सहकार्याने   19 ते 25 नोव्हेंबर 2019  या कालावधीत वर्ल्ड हेरिटेज सप्ताह निमित्त जिल्हयात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमामध्ये उद्या मंगळवार दि. 19 नोव्हेंबररोजी सकाळी 8 ते 10 यावेळेत लक्ष्मीविलास पॅलेस, शाहु जन्मस्थळ येथे वर्ल्ड हेरिटेज सप्ताहाचा शुभारंभ व हेरिटेज साईट भेट तर दुपारी 4 त 6 या वेळेत दसरा चौक, बोर्डिंग इमारत, चित्रदुर्ग मठ येथे हेरिटेज साईट भेट असे कार्यक्रम होणार असून याचे आयोजक HCC- जिल्हा व शहर, हॉटेल मालक संघ हे आहेत.
बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 10 यावेळेत टाऊन हॉल येथे हेरिटेज साईट भेट तर दुपारी 4 त 6 या वेळेत पंचगंगा घाट, ब्रम्हपुरी येथे हेरिटेज साईट भेट हे कार्यक्रम होणार असून याचे आयोजक HCC- जिल्हा व शहर, हॉटेल मालक संघ हे आहेत.
गुरुवार दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 10 यावेळेत रंकाळा येथे हेरिटेज साईट भेट तर दुपारी 4 त 6 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे हेरिटेज साईट भेट  हे कार्यक्रम होणार असून याचे आयोजक HCC- जिल्हा व शहर, हॉटेल मालक संघ हे आहेत.
शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 10 यावेळेत साठमारी येथे हेरिटेज साईट भेट तर दुपारी 4 त 6 या वेळेत खासबाग मैदान येथे हेरिटेज साईट भेट  हा कार्यक्रम होणार असून याचे आयोजक HCC- जिल्हा व शहर, हॉटेल मालक संघ हे आहेत.
शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 10 यावेळेत महाराणी आईसाहेब पुतळा, 5 चित्रमंदिर, छ. शिवाजी महाराज तांत्रिक संस्था येथे हेरिटेज वास्तू शोध हा कार्यक्रम होणार असून याचे आयोजक क्रिडाई कोल्हापूर  व HCC- जिल्हा व शहर, हॉटेल मालक संघ हे आहेत, तर दुपारी 4 त 6 या वेळेत बिंदू चौक  येथे हेरिटेज साईट भेट  हा कार्यक्रम होणार असून याचे आयोजक HCC- जिल्हा व शहर, हॉटेल मालक संघ हे आहेत.
रविवार दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 10 यावेळेत भवानी मंडप ते नर्सरी बाग  येथे पारंपारिक पोशाखासह हेरिटेज वॉक हा कार्यक्रम होणार असून याचे आयोजक रोटरी मुव्हमेंट कोल्हापूर हे आहेत. तर दुपारी 4 त 6 या वेळेत मधुसूधन हॉल- हॉटेल पॅवेलियन येथे पारंपारिक पाककृती -खाद्य महोसत्वाचे उद्घाटन होणार असून याचे आयोजक क्रिडाई कोल्हापूर हे आहेत. तसेच याचवेळी शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने छायाचित्रण स्पर्धांचे आयोजन तर जिल्हाधिकारी कार्यालय  येथे भिंतीवरील कलसकृती -स्पर्धा प्रदर्शनाचे आयोजन केले असून  या कार्यक्रमाचे आयोजक आयआयआयडी-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझाइनर हे आहेत.
सोमवार दि. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 10 यावेळेत विठ्ठल/ रंकभैरव मंदिर येथे हेरिटेज साईट भेट व छायाचित्रण स्पर्धा हा कार्यक्रम होणार असून याचे आयोजक HCC- जिल्हा व शहर, हॉटेल मालक संघ आणि कोल्हापूर प्रेस क्ल्ब हे आहेत. तर दुपारी 4 त 6 या वेळेत लक्ष्मी विलास पॅलेस शाहू जन्मस्थळ येथे वर्ल्ड हेरिटेज सप्ताहाचा सांगता सभारंभ होणार आहे. या कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.