कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 2 : मौजे गांधीनगर ते मौजे
चिंचवाड रस्त्याच्या मध्यापासून 47 मीटर अंतरामध्ये अनधिकृत झालेली बांधकामे
थांबविली आहेत. परंतु काही व्यक्ती अंतर्गत काम करण्याच्या उद्देशाने सर्वोच्च
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत असतील तर अशी बांधकामे तात्काळ पाडून टाकावीत
व त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबतचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले
आहेत. याची सर्व संबंधित मिळकतधारकांनी
नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.