शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९

छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम



कोल्हापूर, दि. 22 (जि.मा.का.) : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी कळविले आहे.  
          20 डिसेंबर 2019 (शुक्रवार) पर्यंत मतदार नोंदणीसंदर्भातील दावे व हरकती (नमुना क्रमांक 06, 06अ, 07, 08 व 08 अ) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे किंवा संबंधित तालुक्यातील तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत स्वीकारण्यात येणार आहेत.
निवडणूक आयोगाने मतदार यादी अद्ययावत व शुध्दीकरण करण्याच्या हेतुने विशेष संक्षिप्त कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार पडताळणी कार्यक्रम हाती घेतला आहे. हा कार्यक्रम दिनांक 20 डिसेंबर 2019 (शुक्रवार) पर्यंत राबविला जाणार आहे. या मतदार पडताळणी कार्यक्रमामध्ये मतदारांनी भारतीय पारपत्र, वाहन परवाना,आधार कार्ड, रेशनकार्ड, शासकीय/अर्धशासकीय कार्यालयातील ओळखपत्रे, बॅंकेचे पासबुक,     शेतकऱ्यांचे ओळखपत्र, पॅनकार्ड, NPR अंतर्गत आरजीआयने जारी केलेले स्मार्ट कार्ड आणि त्यांच्या पत्त्यासाठी अर्जदाराच्या नावे किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जसे पालकांच्या नावे असलेल्या पाणी/टेलिफोन/वीज/गॅस कनेक्शनचे बील या कागदपत्रांपैकी एका कागदपत्राची प्रत देवून त्यांच्या सध्या असलेल्या मतदार तपशीलाचे प्रमाणिकरण करुन घ्यावे.
मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत मतदार  खालील मार्गाने त्यांचे तपशील तपासू शकतील. NVSP Portal, मतदार हेल्पलाईन - मोबाईल ॲप, सामान्य सेवा केंद्रांवर (सीएससी) भेट देऊन  भरलेल्या फॉर्मची हार्ड कॉपी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे सादर करुन मतदार यादीत नांव नोंदणीसाठी पात्र, तथापी अद्यापही मतदार यादीत नांव सामाविष्ट नसलेल्या सर्व पात्र नागरीकांना मतदार यादीत नांव सामाविष्ट करण्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
या मोहिमेत मतदारांनी आपल्या आवश्यकतेप्रमाणे नमुना क्रमांक 06,06अ, 07,08 व 08अ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा संबंधित तालुक्यातील तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखा यांच्याकडे सादर करावेत किंवा आयोगाने विकसित केलेल्या https://www.nvsp.in/ या प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने भरावेत, असे आवाहनही  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.