कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 5
: सांगली येथे पार पडलेल्या कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात
कोल्हापूर पोलीस संघाला 2 रजत आणि 5 कांस्यपदक मिळाली आहेत.
काल
झालेल्या स्पर्धेमध्ये नार्कोटिक्स डॉग प्रकारात डॉग हॅंडलर पोलीस हवालदार
राजेंद्र डाके आणि डॉग लिना यांना रजतपदक,
कॉम्प्युटर अवेअरनेस प्रकारात पोलीस नाईक अमित सर्जे यांना रजतपदक मिळाले
आहे.
क्राईम
इन्व्हेस्टिगेशन प्रकारात पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, ऑबझर्व्हेशन प्रकारात पोलीस
शिपाई राजेंद्र ओंबासे, बीडीडी रूम सर्च प्रकारात पोलीस शिपाई प्रविण मगदूम एमएस
ऑफिस प्रकारात आणि व्हीबी एनईटी प्रकारामध्ये कांस्यपदक मिळाले आहे.
पोलीस
अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांघिक व वैयक्तिक
खेळामध्ये पोलीस दलाने ही उज्वल कामगिरी
केली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.