गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

धार्मिक अल्पसंख्यांक विदयार्थ्यांसाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी प्रस्ताव सादर करावेत -जिल्हाधिकारी दौलत देसाई



            कोल्हापूर, दि. 14 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विदयार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी इच्छुक शाळांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक 30 नोव्हेंबर, 2019 अखेर सादर करावेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 
            जिल्ह्यात असलेल्या जास्तीत जास्त धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक  प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी  प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.