कोल्हापूर,
दि. 13 (जि.मा.का.): कोल्हापूर
जिल्हा शासकीय संकेत स्थळावरील सर्वंच माहिती अद्ययावत करण्यात येत असून कोल्हापूर
जिल्ह्याविषयीची माहिती अधिक अचूक व खात्रीशीर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांनी एनआयसीला दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाने एनआयसीच्या मदतीने
कोल्हापूर जिल्हा शासकीय संकेतस्थळ विकसित केले असून यामध्ये नमुद केलेल्या
माहितीमध्ये चुकीची माहिती व संदर्भ अपलोड होता कामा नये, अशी सक्त सूचनाही
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी संबंधितांना दिली. तसेच चुकीची व अपूर्ण माहिती
तात्काळ दुरूस्त करून शासकीय संकेतस्थळ अधिक अद्ययावत कसे राहील याचीही खरबरदारी
घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच यामध्ये टंकलेखनाच्या चुकाही असून त्या दुरूस्त
करण्यात येतील व अशा चुकांबाबत संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश निवासी उप
जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.