पूरग्रस्तांचे अनुदान पुढच्या आठवड्यात
लाभार्थ्यांच्या खात्यावर
--- तहसिलदार
शीतल मुळे
कोल्हापूर,
(जि.मा.का.) दि. 2 : अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे करवीर तालुक्यात मोठे नुकसान
झाले आहे. नुकसान भरपाई अनुदान बँकेमार्फत जमा केले असून, लाभार्थ्यांच्या
खात्यावर पुढच्या आठवडयात जमा होईल, अशी माहिती करवीर तहसिलदार शीतल मुळे-भामरे
यांनी दिली.
जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या
अतिवृष्टीमुळे, पाऊस व पुरामुळे करवीर तालुक्यातील घरे, गोठे, दुकान व्यावसायिक
यांचे फार मोठे नुकसान झाले. सानुग्रह अनुदान, निर्वाह भत्ता, पूर्णत: पडलेल्या
घरांच्या मालकांना निवारा भाडे, गोठा, कारागीर, व्यावसायिक दुकानदार, मयत जनावरे,
बेपत्ता जनावरे आदींबाबतचे अनुदान बँकेमार्फत जमा केले आहे. हे अनुदान
लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पुढील आठवड्यात जमा होणार आहे. नुकसानग्रस्त
लाभार्थ्यांची यादी संबंधित गावचे तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडे देण्यात आली आहे.
याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास संबंधित गावचे तलाठी यांच्याकडे संपर्क साधावा,
असे आवाहनही श्रीमती मुळे-भामरे यांनी केले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.